बीएसएफचे कार्यक्षेत्र वाढवण्याचा विचार - अमित शहा (Photo-X/@AmitShah)
राष्ट्रीय

बीएसएफचे कार्यक्षेत्र वाढवण्याचा विचार - अमित शहा

सीमा सुरक्षा दलाकडे नवीन क्षेत्रे सोपवून त्यांच्याकडे कामाची अधिक जबाबदारी देण्याचा सरकार विचार करीत आहे असे प्रतिपादन गृहमंत्री अमित शहा यांनी केले.

Swapnil S

भुज : सीमा सुरक्षा दलाकडे नवीन क्षेत्रे सोपवून त्यांच्याकडे कामाची अधिक जबाबदारी देण्याचा सरकार विचार करीत आहे असे प्रतिपादन गृहमंत्री अमित शहा यांनी केले.

सीमेलगतच्या प्रदेशाची प्रादेशिक सुरक्षाही त्यांच्याकडे देण्याचे संकेत त्यांनी दिले. केंद्र सरकारने बीएसएफची सीमा सुरक्षेची संकल्पना बदलण्याचा निर्णय घेतला आहे, असेही ते म्हणाले.

सध्या बीएसएफ भारत-पाकिस्तान आणि भारत-बांगलादेश सीमांचे रक्षण करते.

बीएसएफच्या ६० व्या वर्धापन वर्षाचे औचित्य साधून सीमा सुरक्षेची संकल्पना पूर्णपणे बदलली जाणार आहे.

यात सामान्य नागरिक, नागरी प्रशासन, स्थानिक पोलीस आणि लष्कर यांच्या सहकार्याने 'प्रादेशिक सुरक्षा' हा नवा दृष्टिकोन राबवला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

पोलिसांचा नकार! जरांगेंच्या मुंबई आंदोलनाला परवानगी नाही; द्वेषबुद्धीचा निर्णय, उपोषण होणारच - मनोज जरांगे

राज्यात हे काय चालले आहे?

आजचे राशिभविष्य, १४ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

हरतालिका तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा! सौभाग्य, सुख-समृद्धीसाठी प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा संदेश अन् शेअर करा आकर्षक कार्ड्स

Ganesh Chaturthi 2026 : 'लाडक्या बाप्पाची स्वारी आली!' आप्तेष्टांना पाठवा प्रेम, आनंद आणि भक्तीने सजलेल्या मराठी शुभेच्छा अन् HD कार्ड्स