(संग्रहित फोटो)
राष्ट्रीय

राहुल यांची खोटेपणाची फॅक्टरी - शहा

मुक्त व्यापारकरार आणि भारत-अमेरिका करारामध्ये शेतकरी आणि मच्छिमारांच्या हितांचे पूर्ण रक्षण करण्यात आले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले.

Swapnil S

कराईकल : मुक्त व्यापारकरार आणि भारत-अमेरिका करारामध्ये शेतकरी आणि मच्छिमारांच्या हितांचे पूर्ण रक्षण करण्यात आले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी खोटे बोलून लोकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोपही यावेळी शहा यांनी केला.

राहुल गांधी यांनी दररोज खोटे बोलण्याची एक नवी परंपरा सुरू केली आहे, खोटे बोलणे, जोरात खोटे बोलणे आणि तेच पुन्हा पुन्हा सांगणे ही राहुल यांची नीती आहे, मात्र जनतेने आता तुमची खोटेपणाची फॅक्टरी ओळखली आहे, असे गृहमंत्री म्हणाले. मुक्त व्यापार करार आणि भारत-अमेरिका करारातील तरतुदींचा सखोल अभ्यास केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय शेतकरी आणि मच्छिमारांसाठी १०० टक्के सुरक्षा निश्चित केली आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे हित विकले गेले होते, आता २०२९ मध्ये मोदींच्या नेतृत्वाकाळील भाजपप्रणित 'एनडीए'च पुन्हा केंद्रात सत्तेवर येईल, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला.

ज्ञानेशांविरोधात 'गर्जना'; सर्वपक्षीय मोर्च्यात राज्यातील SIR रद्द करण्याची मागणी

ज्ञानेश कुमार यांच्यावरील याचिकांवर आज सुनावणी

नागरिकांचे मत काढून घेणारी प्रक्रिया मनमानी; सर्वोच्च न्यायालयाचे न्या. उज्ज्वल भुयान यांची चपराक

GST अधिकाऱ्यांवर आता लागणार लगाम; जीएसटी अंमलबजावणीत व्यापक सुधारणा होणार

महिला डॉक्टर मारहाण प्रकरण : रमेश म्हात्रेसह चार जणांची रवानगी तुरुंगात