राष्ट्रीय

खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंहच्या अटकेसाठी पोलिसांचे सर्च ऑपरेशन

अमृतपाल सिंहच्या सर्व साथीदारांना अटक करण्यात आली असून त्यालाही लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती जालंधरचे पोलिसांनी दिली

प्रतिनिधी

पंजाबमध्ये खलिस्तानी समर्थक आणि 'वारीस पंजाब दे' या संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंहच्या अटकेसाठी पोलिसांनी धडक कारवाई सुरु केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत त्याच्या ७८ साथीदारांना अटक केली आहे. तर, एनआयएने नुकतेच त्याचे साथीदार दलजित सिंह कलसीसह ४ जणांना अटक केली. त्यामुळे अमृतपालही लवकरच तावडीमध्ये सापडेल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

जालंधरचे पोलीस आयुक्त के.एस. चहल यांनी माहिती दिली की, "पोलिसांनी अमृतपालचा २० ते २५ किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. पण, तो पळून जाण्यात यशस्वी ठरला. पण पोलिसांनी शस्त्रांसह २ गाड्या जप्त केल्या असून अमृतपालचा शोध सुरू आहे." दरम्यान, त्याला शोधण्यासाठी पंजाब पोलिसांनी मोठी शोध मोहीम सुरू केली. शनिवारी त्याला अटक करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून त्याची गाडी नकोदर येथे उभी असल्याचे आढळून आले. या शोधमोहिमेसाठी पोलिसांनी मोठी तयारी केली असून संपूर्ण पंजाबमध्ये २० मार्चपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहणार आहे.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन