नवी दिल्ली : केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण खरेदी परिषदेने भारतीय लष्कर,नौदलासाठी खास मूर्ड-माईन्स सहित १० खरेदी प्रस्तावांना मंजुरी दिली. या खरेदीचे मूल्य १.५ लाख कोटी रुपये आहे. नौदलासाठी सुरुंगविरोधी जहाज, पाण्याच्या आतून प्रवास करणारे यान आदींची खरेदी केली जाणार आहे. नौदलासाठी सुरुंगविरोधी जहाजे खरेदी केली जातील.
जेव्हा शत्रूच्या समुद्र सीमेत गेल्यानंतर तेथे काही सुरुंग पेरलेले असतात. तेव्हा सुरुंग विरोधी जहाजाच्या सहाय्याने ते निकामी केले जातात. या जहाजांची किंमत ४४ हजार कोटी रुपये असू शकते. तसेच लष्करासाठी क्यूआरसॅम क्षेपणास्त्र खरेदीला मंजुरी दिली. या क्षेपणास्त्र खरेदीचे मूल्य ३३ हजार कोटी रुपये आहे. तसेच तिन्ही दलांसाठी चिलखती वाहने, इलेक्ट्रॉनिक्स वॉरफेअर सिस्टीम खरेदीला मंजुरी देण्यात आली.