केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव 
राष्ट्रीय

महिलांसाठी कॅन्सरवरील लस ५-६ महिन्यांत; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची महत्त्वाची माहिती

देशात कर्करोगाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतात स्तनाच्या कर्करोगापेक्षा सर्वात प्राणघातक आणि वेगाने पसरणारा कर्करोग म्हणजे गर्भाशय ग्रीवा किंवा गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग.

Swapnil S

नवी दिल्ली : देशात कर्करोगाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतात स्तनाच्या कर्करोगापेक्षा सर्वात प्राणघातक आणि वेगाने पसरणारा कर्करोग म्हणजे गर्भाशय ग्रीवा किंवा गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग. अनेक तरुणींना या गंभीर आजाराची लागण होत आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने त्यासाठी पुढाकार घेतला असून महिलांमध्ये कर्करोगावर उपचार करणारी लस पुढील पाच ते सहा महिन्यांत उपलब्ध होणार आहे. ही लस ६ ते १६ वर्षे वयोगटातील मुलींना दिली जाईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली.

ते म्हणाले की, “देशात कर्करोगाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे आणि सरकार या समस्येचा सामना करण्यासाठी पावले उचलत आहे. ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी रुग्णालयांमध्ये कर्करोग तपासणी केली जाणार आहे. यासोबतच कर्करोगाच्या उपचारांसाठी ‘डे केअर कर्करोग केंद्रे’देखील स्थापन केली जातील. आता कर्करोगाच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या औषधांवरील सीमाशुल्कही रद्द करण्यात आले आहे. यामुळे कर्करोगाचा प्रसार रोखण्यात यश मिळणार आहे.”

सध्या लसीच्या चाचण्या सुरू

“महिलांसाठी कर्करोगावरील लस पुढील पाच ते सहा महिन्यांत उपलब्ध होणार आहे. या लसीवरील संशोधनकार्य जवळपास पूर्ण झाले आहे आणि सध्या चाचण्या सुरू आहेत. ही लस महिलांमध्ये होणाऱ्या सर्वात सामान्य प्रकारच्या कर्करोगापासून संरक्षण प्रदान करेल. यात स्तनाचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगाचा समावेश आहे. यामुळे महिलांचे आरोग्य सुधारण्यास मदत होणार आहे,” असेही त्यांनी सांगितले.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video