राष्ट्रीय

माध्यमांशी बोलताना कॅमेरासमोर घातल्या गोळ्या; अतिक अहमद आणि त्याच्या भावाची हत्या

कुख्यात डॉन आणि राजकारणी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांना वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना ३ जणांनी झाडल्या गोळ्या

नवशक्ती Web Desk

कुख्यात डॉन आणि राजकारणी अतिक अहमद याची माध्यमांच्या कॅमेरासमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. १३ तारखेला अतिक अहमदचा मुलगा असदचा एन्काउंटर करण्यात आला होता. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच अतिक अहमदच्या या हत्येमुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांना वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात असताना ३ अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यावेळी त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांच्या डोळ्यादेखत झालेल्या या हत्येमुळे आता उत्तर प्रदेशच्या सरकारवर अनेक टीका होऊ लागल्या आहेत. या घटनेनंतर प्रयागराजमध्ये मोठा तणाव निर्माण झाला असून योगी सरकारने तातडीने कारवाया सुरु केल्या आहेत.

अतिक अहमद आणि अशरफ अहमद या दोघानांही पोलिसांच्या बंदोबस्तात वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जात होते. यावेळी काही माध्यमांनी त्यांना मुलगा असद अहमदच्या एन्काउंटरबद्दल प्रश्न विचारण्यासाठी घेराव घातला. याचवेळी पत्रकार, कॅमेरामॅन बनून आलेल्या ३ जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यावेळी ते दोघेही जमिनीवर पडले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. यावेळी पोलिसांनी ३ जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून तीन पिस्तूल, एक दुचाकी आणि एक व्हिडीओ कॅमेरा जप्त केला असून त्यांना तिथे एका वृत्तवाहिनीचा लोगोही सापडला आहे. त्या दोघांवर गोळ्या झाडल्यानंतर आरोपींनी आत्मसमर्पण केले.

अतिक अहमद, अशर्रफ अहमदच्या हत्येनंतर योगी सरकारने पोलिसांवर कारवाई केली आहे. त्या दोघांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेले १७ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच प्रयागराजमध्ये शांतता, सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. तसेच, कलम १४४ही लागू करण्यात आले. तसेच, पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करून सुट्टीवर गेलेल्या पोलिसांना तातडीने हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

"भगवा आणि हिंदुत्वाचा विजय"; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष ठरल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांना अश्रू अनावर

2008 Malegaon Blast : 'दंगलींचे शहर' बॉम्बस्फोटाने काळवंडले! मालेगावच्या इतिहासातील काळा दिवस

"भारत-रशियाने मिळून त्यांची आधीच डबघाईस आलेली अर्थव्यवस्था..."; टॅरिफच्या तडाख्यानंतर ट्रम्प यांचा थेट निशाणा

2008 Malegaon Blast : ठोस पुरावेच नाही! साध्वी प्रज्ञा, पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष, १७ वर्षांनंतर आला निकाल

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’