राष्ट्रीय

रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेची वर्षपूर्ती; भव्य कार्यक्रमांचे आयोजन

देशभरातील हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील राम मंदिरात भगवान रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठेला शनिवारी एक वर्ष पूर्ण झाले.

Swapnil S

वाराणसी : देशभरातील हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील राम मंदिरात भगवान रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठेला शनिवारी एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने श्री राम जन्मभूमी ट्रस्टने मंदिराचा पहिला वर्धापनदिन साजरा करण्यासाठी भव्यदिव्य कार्यक्रमांचे आयोजन केले होते. देशभरही वर्षपूर्तीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे उत्साह पाहायला मिळाला.

गेल्या वर्षी २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील भगवान राम मंदिराचे उद्घाटन झाले होते. हिंदू पंचांगानुसार, ज्या दिवशी रामललाची प्राणप्रतिष्ठा झाली ती पौष शुक्लाची द्वादशी तिथी होती. या वर्षी २०२५ मध्ये पौष शुक्ल द्वादशी ११ जानेवारी रोजी असल्याने शनिवारी पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते रामलल्लाची आरती करण्यात आली. १३ जानेवारीपर्यंत हा महोत्सव रंगणार असून विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

२४ तासांत आंदोलकांना हटवा! मुंबई उच्च न्यायालयाचा जरांगे यांना अल्टिमेटम; आझाद मैदानात फक्त पाच हजार आंदोलकांना परवानगी

सुहाना खानच्या अडचणी वाढणार? शेतजमीन खरेदीवर वाद; अटींचा भंग केल्याचा आरोप; महसूल विभागाकडून चौकशी सुरू

Maratha Reservation : आंदोलनाला ‘खेळकर’ रंग; आंदोलकांचे मुंबईत क्रिकेट, कबड्डी, खो-खो

पुण्याहून आझाद मैदानाकडे निघालेल्या मराठा बांधवांवर पनवेलमध्ये किरकोळ कारणावरून हल्ला; ५ जण जखमी, दोघांना अटक

मत चोरीच्या अणुबॉम्बनंतर आता हायड्रोजन बॉम्ब येणार; मोदींना चेहरा लपविण्यासाठीही जागा मिळणार नाही; राहुल गांधींचा मोठा इशारा