राष्ट्रीय

समुद्रमार्गे रशियातील मॉस्को शहराला केळी निर्यात; अपेडाद्वारे भारतातून ताज्या फळांची निर्यात करण्याची मोठी क्षमता

मेसर्स गुरुकृपा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली माल पाठवण्यात आला. हा महिला उद्योग अपेडामध्ये नोंदणीकृत आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने (अपेडा) भारतातून रशियाला समुद्रमार्गे केळी निर्यात करण्याची सुविधा प्रदान केली आहे. मेसर्स गुरुकृपा कॉर्पोरेशन प्रा. लि. ही मुंबईमधील फळे आणि भाजीपाल्याची निर्यातदार कंपनी युरोपियन युनियन आणि मध्य पूर्वेकडील देशांना नियमितपणे ताजी फळे आणि भाज्यांची निर्यात करत आहे.

उप उष्ण कटिबंधीय फलोत्पादन केंद्रीय संस्थेच्या सहकार्याने राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमात, यंदा १७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातून २० मेट्रिक टन (१५४० बॉक्स) केळीची खेप अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केली. अपेडाने वाहतुकीदरम्यान फळांची गुणवत्ता राखण्यासाठी उप उष्ण कटिबंधीय फलोत्पादन केंद्रीय संस्थेद्वारे या निर्यातीसाठी नियुक्त केलेल्या समुद्री मार्गदर्शक तत्त्वांचा विकास अधोरेखित केला.

अपेडा अधिकाधिक निर्यातदारांनी नवीन उत्पादने नवीन ठिकाणी पाठवण्यासाठी नवीन पद्धती वापरण्याच्या प्रयत्नांना सुलभ बनवून तसेच संपूर्ण पाठिंबा देऊन प्रोत्साहित करत असल्याचे अपेडाच्या अध्यक्षांनी यावेळी सांगितले. महिला नवउद्योजकांना पाठिंबा देण्यावर विशेष भर देत असलेल्या अपेडाच्या आर्थिक सहाय्य योजनेवर त्यांनी प्रकाश टाकला. सागरी मार्गदर्शक तत्त्वांच्या विकासात उप उष्ण कटिबंधीय फलोत्पादन केंद्रीय संस्था करत असलेल्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले आणि यशस्वी निर्यातीसाठी सर्वांचे अभिनंदन केले. अलीकडेच, रशियाने भारताकडून उष्णकटिबंधीय फळांच्या खरेदीमध्ये उत्सुकता दर्शविली असून केळी हे त्यातीलच एक फळ आहे. केळी ही रशियाची एक प्रमुख कृषी आयात असून सध्या रशियात प्रामुख्याने लॅटिन अमेरिकेतील इक्वाडोर येथून केळी आयात होतात.

भारतीय केळीच्या प्रमुख निर्यात स्थळांमध्ये इराण, इराक, संयुक्त अरब अमिरात, ओमान, उझबेकिस्तान, सौदी अरेबिया, नेपाळ, कतार, कुवेत, बहारीन, अफगाणिस्तान आणि मालदीव या देशांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, अमेरिका, रशिया, जपान, जर्मनी, चीन, नेदरलँड्स, ब्रिटन आणि फ्रान्स हे देश देखील भारताला निर्यातीच्या मुबलक संधी उपलब्ध करून देतात.

मेसर्स गुरुकृपा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली माल पाठवण्यात आला. हा महिला उद्योग अपेडामध्ये नोंदणीकृत आहे. केळी हे भारतातील एक प्रमुख बागायती उत्पादन असून आंध्र प्रदेश हे देशातील सर्वात मोठे केळी उत्पादक राज्य आहे. केळी उत्पादनात त्यानंतर महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश यांचा क्रमांक लागतो. २०२२-२३ या आर्थिक वर्षात भारताच्या केळी उत्पादनात या पाच राज्यांचा एकत्रितपणे ६७ टक्के वाटा आहे.

जगातील केळी उत्पादनापैकी २६.४५ टक्के (३५.३६ दशलक्ष मेट्रिक टन) भारतात होते, तरीही जागतिक बाजारपेठेत भारताच्या निर्यातीचा वाटा केवळ १ टक्के आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात भारताने १७६ दशलक्ष डॉलर्स किमतीची केळी निर्यात केली, जे ०.३६ एमएमटी समतुल्य आहे.

WhatsApp च्या नव्या Username फीचरवर केंद्र सरकारची नजर; सायबर फ्रॉडचा धोका, 'मेटा' ला नोटीसची शक्यता

Navi Mumbai : नेरुळमध्ये साचलेल्या पाण्यात उतरला करंट; स्कुटीवरून जाणाऱ्या दोन विद्यार्थिनी जखमी, Video

ठाकरे गटाने उमेदवारी मागे घेतली; सचिन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड

माहेरी गेलेली बायको परत आली नाही म्हणून मेहुणीलाच पळवलं; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

व्हेनेझुएलात भारतीय खलाशाचा मृत्यू; शवविच्छेदन अहवालात धक्कादायक खुलासा, मेंदू, हृदयासह महत्त्वाचे अवयव गायब