राष्ट्रीय

बांगलादेशची निवडणूक पक्षपाती अमेरिकेची टीका : संयुक्त राष्ट्रांकडूनही हिंसाचारावर चिंता

बांगलादेश सरकारने भारत आणि इतर देशांतील परदेशी निरीक्षकांना तसेच बहुपक्षीय संघटनांना निवडणुकीचे निरीक्षण करण्यासाठी आमंत्रित केले होते.

Swapnil S

ढाका/ संयुक्त राष्ट्रे : भारत, रशिया, चीनसह आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील अनेक राष्ट्रांनी पंतप्रधान म्हणून बांगलादेशच्या ऐतिहासिक निवडणुकीत चौथ्यांदा निवडून आल्याबद्दल शेख हसीना यांना शुभेच्छा दिल्या असतानाच, संयुक्त राष्ट्र, अमेरिका आणि ब्रिटनने या निवडणुकांना मुक्त आणि विश्वासार्ह निवडणुका तेथे झाल्या नसल्याचे मत व्यक्त केले आहे.

बांगलादेशमधील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने (बीएनपी) बहिष्कार टाकलेल्या मतदानात हसीना यांच्या अवामी लीग (एएल) ने रविवारी ३०० सदस्यांच्या संसदेत २२३ जागा जिंकल्या. बांगलादेश सरकारने भारत आणि इतर देशांतील परदेशी निरीक्षकांना तसेच बहुपक्षीय संघटनांना निवडणुकीचे निरीक्षण करण्यासाठी आमंत्रित केले होते.

यूएस स्टेट डिपार्टमेंटने सोमवारी एका निवेदनात म्हटले की, हजारो राजकीय विरोधी सदस्यांच्या अटकेमुळे आणि बांगलादेशातील निवडणुकीच्या दिवशी झालेल्या अनियमिततेच्या वृत्तांमुळे अमेरिकेला चिंता वाटते. अमेरिका तसेच इतर निरीक्षकांसोबत मत व्यक्त करताना त्यांच्या परराष्ट्र खात्याने सांगितले की, या निवडणुका मुक्त किंवा निष्पक्ष नव्हत्या आणि आम्हाला खेद वाटतो की सर्व पक्षांनी यात भाग घेतला नाही. आम्ही बांगलादेश सरकारला हिंसाचाराच्या अहवालांची विश्वासार्हपणे चौकशी करण्यासाठी आणि गुन्हेगारांना जबाबदार धरण्यासाठी प्रोत्साहित करतो. आम्ही सर्व राजकीय पक्षांना हिंसा नाकारण्याचे आवाहन करतो, असेही अमेरिकेच्या या निवेदनात म्हटले आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार विभागाचे प्रमुख वोल्कर तुर्क यांनी बांगलादेशच्या नवनिर्वाचित सरकारला लोकशाही आणि मानवाधिकारांप्रती देशाच्या वचनबद्धतेचे नूतनीकरण करण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहन केले. रविवारच्या मतदानाचे वातावरण हिंसाचार आणि विरोधी उमेदवार आणि समर्थकांच्या दडपशाहीमुळे खराब झाले होते, असे त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले. एनचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्या सहयोगी प्रवक्त्या फ्लोरेन्सिया सोटो निनो म्हणाल्या की, त्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या विरोधकांच्या निर्णयाची नोंद केली. ती म्हणाली की, निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या घटनांबद्दल संयुक्त राष्ट्र प्रमुखांना काळजी आहे, असे त्यांनी सांगितले.

मतदारांकडे पर्याय नव्हते

ब्रिटनने आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, बांगलादेशच्या १२ व्या संसदीय निवडणुका विश्वासार्ह आणि निष्पक्ष झालेल्या नाहीत. सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीत भाग घेतला नाही. त्यामुळे बांगलादेशी लोकांकडे मतदानाचे पूर्ण पर्याय उपलब्ध नव्हते. ब्रिटनच्या परराष्ट्र आणि कॉमनवेल्थ ॲण्ड डेव्हलपमेंट ऑफिसने सोमवारी एका निवेदनात ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी