मोठ्या बँकांचे विलीनीकरण गरजेचे; पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेची सूचना प्रातिनिधिक छायाचित्र
राष्ट्रीय

मोठ्या बँकांचे विलीनीकरण गरजेचे; पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेची सूचना

भारताने बँकांचे अशा प्रकारे विलीनीकरण करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत जेणेकरून उद्योग क्षेत्रातील बाजारातील स्पर्धेला बाधा न आणता समान आकाराच्या काही मोठ्या बँका तयार होतील, असे पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेने एका अहवालात म्हटले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली: भारताने बँकांचे अशा प्रकारे विलीनीकरण करण्याचे प्रयत्न केले पाहिजेत जेणेकरून उद्योग क्षेत्रातील बाजारातील स्पर्धेला बाधा न आणता समान आकाराच्या काही मोठ्या बँका तयार होतील, असे पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेने एका अहवालात म्हटले आहे.

‘बँकिंग क्षेत्रात १० वर्षात सुधारणा, कार्यक्षमता आणि उत्पादकता’ या अहवालात म्हटले की, भारत २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ बनण्याचा प्रयत्न करत असताना यामुळे अर्थव्यवस्थेच्या वाढत्या पत गरजा भागवण्यास मदत होईल.

भारतीय बँकिंग उद्योगात एकाधिकारशाही कमी असली, तरी बँकांचा बाजारातील हिस्सा २० टक्क्यांपासून ते १ टक्क्यांपेक्षा कमी असा लक्षणीयरीत्या भिन्न आहे.

भारताने बँकांचे विलीनीकरण अशा प्रकारे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे की उद्योग क्षेत्रातील बाजारातील स्पर्धेला बाधा न आणता समान आकाराच्या काही मोठ्या बँका तयार होतील,’ असे कार्यगटाने म्हटले आहे.

२०१७ मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहयोगी बँकांचे विलीनीकरण, २०१९ मध्ये बँक ऑफ बडोदा-विजया बँक-देना बँक विलीनीकरण आणि २०२० मध्ये १० सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ४ बँकांमध्ये झालेले विलीनीकरण यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या २७ वरून १२ वर आली, असे पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेने म्हटले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : टॅक्सी, रिक्षांच्या मीटरचे फेरप्रमाणीकरण ३० नोव्हेंबरपर्यंत; १ सप्टेंबरपासून मुंबईत रिक्षा, टॅक्सींचे भाडे वाढणार

नियम तोडाल तर कारवाई होणारच; मुंढेंचा इशारा; सणासुदीत भेसळयुक्त विक्रेत्यांवर FDA ची नजर, नवी नियमावली आज करणार जारी

मोहन भागवत यांच्या कार्यक्रमाला न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांचा विरोध

ओबीसी 'क्रिमीलेयर' निकषाबाबत १ सप्टेंबरला सुनावणी

बुलेट ट्रेनचा खर्चही सुस्साट! मुंबई-अहमदाबाद प्रकल्पाचा खर्च झाला दुप्पट; १ लाख कोटीवरून २ लाख कोटी