Poto : X (@Saritanitharwal)
राष्ट्रीय

बाराबंकीतील महादेव मंदिराबाहेर चेंगराचेंगरीत २ भाविकांचा मृत्यू; ४० जण जखमी

उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील प्रसिद्ध अवसानेश्वर महादेव मंदिराबाहेर सोमवारी विजेच्या धक्क्यानंतर चेंगराचेंगरी झाली आणि त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून जवळपास ४० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

Swapnil S

बाराबंकी : उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथील प्रसिद्ध अवसानेश्वर महादेव मंदिराबाहेर सोमवारी विजेच्या धक्क्यानंतर चेंगराचेंगरी झाली आणि त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून जवळपास ४० जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. ही घटना घडली तेव्हा विजेची तार पत्र्याच्या छतावर पडली. यामुळे अनेकांना विजेचे धक्के बसले. श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मंदिराबाहेर मोठी गर्दी केली होती, त्यावेळी ही घटना घडली.

मंदिरात जलाभिषेक सुरू असताना काही माकडांनी मंदिरातील पत्र्याच्या शेडवर उडी मारली. यामु‍ळे विजेची तार तुटली आणि ती छतावर पडली. विजेची तार पडताच त्यातील वीज प्रवाह शेडमध्ये पसरला. यामुळे गोंधळ‍ उडून चेंगराचेंगरी झाली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी मंदिरात जलाभिषेक विधीसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. माकडांमुळे जुन्या विद्युत तारांचे नुकसान झाले. यामुळे विजेचा धक्का बसल्याची माहिती जिल्हा दंडाधिकारी शशांक त्रिपाठी यांनी दिली. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात आहे, असे त्यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बाराबंकी जिल्ह्यातील श्री अवसानेश्वर महादेव मंदिर परिसरातील दुर्दैवी घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तातडीने मदतकार्य करण्याचे आणि जखमींना योग्य उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Mumbai : अखेर वसई-विरारचा मेट्रो मार्ग झाला मोकळा; MMRDA च्या आयुक्तांकडून प्रकल्प अहवाल सादर

पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरांच्या स्वप्नाला बळ; राज्य सहकारी बँकेकडून १,७४८ कोटींचे अर्थसहाय्य

कल्याणमध्ये विनयभंगप्रकरणी भोंदूबाबा गजाआड

पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनाला भाजपचाच हरताळ? साताऱ्यातील प्रधानमंत्री आवास कार्यक्रमावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

प्रियकराला भेटण्यासाठी बांगलादेशी तरुणी जळगावात; सहा महिन्यांपासून बेकायदेशीर वास्तव्य, तरुणीला अटक