हे काय नवीन? लिंबूपाण्यावरही 'गॅस क्रायसिस चार्जेस'; कॅफेचं बिल सोशल मीडियावर व्हायरल 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

हे काय नवीन? लिंबूपाण्यावरही 'गॅस क्रायसिस चार्जेस'; कॅफेचं बिल सोशल मीडियावर व्हायरल

एलपीजी तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर बंगळुरूमधील एका कॅफेच्या बिलाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोन लेमोनेडच्या बिलावर ५ टक्के ‘गॅस क्रायसिस चार्ज’ आकारण्यात आल्याचे दिसत असून या अनोख्या शुल्कावर नेटिझन्समध्ये चर्चा रंगली आहे.

Mayuri Gawade

देशात एलपीजीच्या तुटवड्याची चर्चा सुरू असताना बंगळुरूमधील एका कॅफेच्या बिलाचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या बिलामध्ये लिंबूपाण्यावर "गॅस क्रायसिस चार्ज" नावाने अतिरिक्त शुल्क आकारण्यात आल्याचे दिसत असल्याने नेटिझन्समध्ये चर्चेला उधाण आले आहे.

लिंबूपाण्यावरही गॅस चार्ज...

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वरील एका युजरने बंगळुरूमधील 'Theo Cafe'च्या बिलाचा फोटो शेअर केला. या बिलानुसार दोन मिंट लिंबूपाणी प्रत्येकी १७९ रुपये या दराने मागवण्यात आले होते. दोन्ही पेयांची एकूण किंमत ३५८ रुपये झाली.

बिलावर सुरुवातीला १७.९० रुपयांची सवलत देण्यात आली. त्यानंतर नेहमीप्रमाणे २.५ टक्के सीजीएसटी आणि २.५ टक्के एसजीएसटी आकारण्यात आले. मात्र यासोबतच "गॅस क्रायसिस चार्ज" या नावाने १७.०१ रुपये अतिरिक्त आकारण्यात आले. त्यामुळे अंतिम बिल ३७४ रुपयांपर्यंत पोहोचले.

सोशल मीडियावर विनोदी प्रतिक्रिया

हे बिल व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी विनोदी प्रतिक्रिया दिल्या. काहींनी "लिंबूपाणी बनवताना गॅस लागतो का?" असा सवाल उपस्थित केला, तर काहींनी या अतिरिक्त शुल्कावर टोमणे मारले.

सोशल मीडियावर विनोदी प्रतिक्रिया

एलपीजी तुटवड्याचा परिणाम

दरम्यान, देशात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यात अडथळे येत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि सार्वजनिक कॅन्टीनना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

काही ठिकाणी रेस्टॉरंट्सनी मेन्यूमधील काही पदार्थ तात्पुरते बंद केले आहेत, तर काहींनी पर्यायी इंधनांचा वापर सुरू केला आहे. काही भागांत एलपीजी वितरण केंद्रांबाहेर सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा लागल्याच्याही बातम्या समोर आल्या आहेत.

Mumbai : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! हमाल, पार्किंग, एसी प्रतीक्षागृहाचे अधिकृत दर जाहीर; जादा पैसे घेतल्यास तक्रार करा

Delhi Govindpuri Fire : आग लागली की लावली? CCTV मध्ये संशयास्पद महिला कैद; घातपाताची शक्यता, महिलेचा शोध सुरू

सख्ख्या बहिणीची हत्या करून मृतदेह विहिरीत टाकला; काही वेळातच भावाने पोलिसांसमोर जाऊन दिली कबुली

लंडनमध्ये भारतीय वंशाच्या तरुणाची भररस्त्यात चाकू भोसकून हत्या; पोलिसांकडून तपास सुरू

माथेरानला जाण्याचा प्लॅन करताय? मग ही बातमी वाचाच; उद्यापासून चार महिने टॉय ट्रेन बंद, आता जायचं कसं?