राष्ट्रीय

प्रेम, संशय आणि रक्तरंजित शेवट...; २२ वर्षीय तरुणीची लिव्ह-इन पार्टनरकडून हत्या, आरोपी अटकेत

बंगळुरूमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीची प्रियकराने दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध असल्याच्या संशयातून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या केल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

Mayuri Gawade

बंगळुरूमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीची तिच्याच प्रियकराने हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध असल्याचा संशय मनात धरून झालेल्या वादानंतर प्रियकराने चाकूने तिच्यावर वार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

मृत तरुणीची ओळख आती हंगमा सुब्बा (वय २२) अशी झाली असून ती मूळची सिक्कीमची रहिवासी होती. ती बंगळुरूमधील एका सलूनमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. तर आरोपी फुरबा लेप्चा (वय २६) हा मूळचा दार्जिलिंगचा रहिवासी असून तो एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून कार्यरत होता.

महिनाभरापूर्वीच एकत्र राहायला आले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही रिलेशनशिपमध्ये होते आणि बंगळुरूमध्ये भाड्याच्या घरात एकत्र राहत होते. गेल्या काही आठवड्यांपासून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. सुब्बा दुसऱ्या एका तरुणाशी संपर्कात असल्याचा संशय लेप्चाला होता.

वादाचं रूपांतर हत्येत

रविवारी सकाळी याच कारणावरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. वाद वाढल्यानंतर आरोपीने संतापाच्या भरात स्वयंपाकघरातील चाकू उचलला आणि सुब्बाच्या मानेवर वार केला.

व्हाईटफिल्ड विभागाच्या पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयातून झालेल्या वादादरम्यान आरोपीने तरुणीवर हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या सुब्बाचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने जागीच मृत्यू झाला.

पळून जाण्याचा प्रयत्न, पण पोलिसांनी पकडलं

हत्या केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवत त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणी बेलांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवला

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच घटनास्थळावरून फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्यात येत असून हत्येपूर्वी नेमकं काय घडलं, याचा तपास सुरू आहे.

रस्त्याच्या कामावरून प्रश्न विचारताच तरुणाच्या लगावली कानशिलात; मंत्री प्रवेश वर्मांचा Video सोशल मीडियावर व्हायरल

NCMC Card : अजून कार्ड काढलं नाही? १ ऑक्टोबरपूर्वी करा नोंदणी; कुठे अन् कशी करायची? वाचा संपूर्ण प्रक्रिया

Video : आशुतोष रांकांसह CJP चे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; सुटका न झाल्यास आसामला जाणार, अभिजीत दिपकेंचा इशारा

Mumbai : अनंत चतुर्दशीला नाही तर अंगारकी संकष्टीला होते अंधेरीच्या राजाचे विसर्जन; जाणून घ्या खास परंपरा

LPU Students Protest : बलात्काराच्या अफवेने विद्यार्थ्यांचा उद्रेक; कॅम्पसमध्ये जाळपोळ, महामार्गही रोखला, Video