राष्ट्रीय

बंगळुरूच्या कारागृहातील व्हिडीओ व्हायरल; तुरुंगात कैद्यांची जंगी पार्टी, दारू पिऊन डान्सही केला

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत दारूने भरलेले डिस्पोजेबल ग्लास, कापलेल्या फळांच्या प्लेट्स, तळलेले शेंगदाणे आणि काही कैदी भांडी वाजवत आहेत आणि त्यावर काही कैदी डान्स करत तुरुंगात पार्टी करत असल्याचे दिसत आहे. तसेच व्हिडीओमध्ये काही छोट्या...

Swapnil S

बंगळुरू : बंगळुरुमधील मध्यवर्ती कारागृहामध्ये कैदी मोबाईलचा वापर करत असल्याचा कथित व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये कुख्यात गुन्हेगारही तुरुंगात मोबाईल वापरत असल्याचे दिसून आले होते. त्यानंतर आता तुरुंगात कैद्यांची जंगी पार्टी झाल्याचा आणखी एक कथित व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून तुरुंग प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.

व्हायरल होणाऱ्या तुरुंगातील या व्हिडीओत कैदी दारू पिऊन डान्स करताना दिसत आहेत. एवढेच नाही तर व्हिडीओत कारागृहाच्या आतमध्ये दारू, फळे दिसत असल्याने हे मध्यवर्ती कारागृह आहे की एखादे हॉटेल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत दारूने भरलेले डिस्पोजेबल ग्लास, कापलेल्या फळांच्या प्लेट्स, तळलेले शेंगदाणे आणि काही कैदी भांडी वाजवत आहेत आणि त्यावर काही कैदी डान्स करत तुरुंगात पार्टी करत असल्याचे दिसत आहे. तसेच व्हिडीओमध्ये काही छोट्या दारूच्या बाटल्या दिसत असून कैदी भांडी वाजवण्याच्या आवाजावर नाचताना पाहायला मिळत आहेत.

गृहमंत्री काय म्हणाले?

कैद्यांच्या पार्टीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गृहमंत्री जी परमेश्वर यांनी, तुरुंगातील या प्रकारची सरकारने गंभीर दखल घेतली असल्याचे सांगितले. तसेच संबंधित घटनेचा अतिरिक्त पोलीस महासंचालकांकडून अहवाल मागितल्याचेही ते म्हणाले. मी त्यांना (पोलीस महासंचालकांना) अहवाल देण्यास सांगितले आहे. जर अहवाल समाधानकारक नसेल, तर मी एक वेगळी समिती स्थापन करून चौकशी करेन. मात्र, मी हा प्रकार सहन करणार नाही, आता खूप झाले, कारण अशा गोष्टी पुन्हा घडू नयेत, असे गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.

कर्मचाऱ्यांची कमतरता

तुरुंग अधिकारी अनेकदा म्हणतात की, कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. पण कर्मचाऱ्यांनी किमान त्यांची कर्तव्ये तरी व्यवस्थित पार पाडली पाहिजेत. ते कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचे कारण पुढे करून जर टेलिव्हिजन, मोबाईल फोन आणि इतर गोष्टी कैद्यांना पुरवत असतील तर त्याला तुरुंग का म्हणायचे, असा सवालही गृहमंत्र्यांनी उपस्थित केला.

तसेच कैद्यांना मोबाईल फोन उपलब्ध कसे होतात, यावर उत्तर देताना गृहमंत्री म्हणआले की, कारागृहात फोन किंवा इतर कोणत्याही सुविधा कोणाच्याही हातात नसाव्यात. तसेच तुरुंग अधिकाऱ्यांनी व्हिडीओची सत्यता पडताळण्यासाठी आणि तुरुंगातील सुरक्षेतील त्रुटींसाठी जबाबदार असलेल्यांची चौकशी सुरू असून पुढील कारवाई होईल, असे सांगितले.

Red Fort Blast : दिल्ली स्फोटाचे पुलवामा कनेक्शन? फरिदाबादचा डॉक्टरच ‘बॉम्बर’ असल्याचा संशय

Mumbai : शासकीय कार्यालयांमुळे BMC ला फटका; थकवला तब्बल ₹१८०० कोटींचा मालमत्ता कर

बीएलए नियुक्तीत उदासीनता! भाजप वगळता अन्य पक्षांत निरुत्साह; मविआसह मनसेची नेमणुकीकडे पाठ

पादचारी सुरक्षेसाठी कृती आराखडा करा; मुंबई, पुणे, नागपूर महानगरपालिकांना राज्य सरकारचे निर्देश

बोपोडी जमीन गैरव्यवहार प्रकरण: पार्थ पवार, शीतल तेजवानी यांना पुणे पोलिसांकडून ‘क्लीनचिट’