राष्ट्रीय

६० वर्षांच्या महिलेचं ३५ वर्षीय युवकावर जडलं प्रेम, पळून जाऊन केलं लग्न; नंतर सुरू झाला हाय-व्होल्टेज ड्रामा

६० वर्षांची महिला आणि आरा येथील रहिवासी वकील मिश्रा (वय ३५) यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. रविवारी दोघे अमरपूर बस स्थानकावर गेले असताना...

किशोरी घायवट-उबाळे

प्रेमाला वयाची अट नसते, असे म्हटले जाते. बिहारच्या बांका जिल्ह्यातून समोर आलेली एक घटना याच म्हणीची प्रचिती देणारी ठरली आहे. येथील ६० वर्षांच्या महिलेला ३५ वर्षीय युवकावर प्रेम जडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रविवारी (दि.११) अमरपूर बस स्थानकावर या अनोख्या प्रेमकथेचा पर्दाफाश झाला.

बस स्थानकावर हाय-व्होल्टेज ड्रामा, युवकाला मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना अमरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. सुमारे ६० वर्षांची महिला आणि आरा येथील रहिवासी वकील मिश्रा (वय ३५) यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. रविवारी दोघे अमरपूर बस स्थानकावर गेले असताना ही बाब महिलेच्या कुटुंबीयांच्या लक्षात आली. काही वेळातच महिलेचा पती आणि मुलगा घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी संतप्त होत युवकाला मारहाण केली. सार्वजनिक ठिकाणी झालेल्या या प्रकारामुळे बस स्थानकावर एकच गोंधळ उडाला आणि मोठी गर्दी जमली.

'रॉन्ग नंबर' वरून सुरू झाली प्रेमकहाणी

पोलीस ठाण्यात चौकशीदरम्यान महिलेने आपली बाजू मांडली. तिच्या म्हणण्यानुसार, चार महिन्यांपूर्वी एका चुकून लागलेल्या फोन कॉलवरून तिची ओळख वकील मिश्राशी झाली. फोनवरील संवादातून ओळख वाढली आणि त्याचे पुढे प्रेमात रूपांतर झाले. दोघांनी भागलपूर रेल्वे स्थानकावर भेटण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर ते लुधियानाला गेले, जिथे परस्पर संमतीने त्यांनी विवाह केल्याचा दावा महिलेने केला आहे. “आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करतो आणि लुधियानामध्ये लग्न केले आहे,” असे महिलेने सांगितले.

पोलिसांच्या संरक्षणात प्रेमी युगुल

मिळालेल्या माहितीनुसार, परिस्थिती चिघळू नये म्हणून स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करत दोघांना अमरपूर पोलीस ठाण्यात नेले. महिलेचे पती आणि मुले या नात्याला विरोध करत असून त्यांची मानसिक अवस्था अत्यंत खालावलेली आहे. अमरपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पंकज कुमार झा यांनी सांगितले की, “प्रेमी युगुलाला पोलिस संरक्षणात ठेवण्यात आले आहे. प्रकरण संवेदनशील असल्याने दोन्ही बाजू ऐकून आणि कायदेशीर बाबी तपासल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल.”

IIT मुंबईतील विद्यार्थ्याची आत्महत्या; परीक्षेत ChatGPT वापरल्याचा आरोप, प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

Ulhasnagar : धुक्याच्या आड रात्री ‘केमिकल गॅस’चा खेळ? उग्र वास अन् धुक्याची चादर; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Ganeshotsav 2026 : गणपतीच्या सजावटीत FDA ची झलक; तुकाराम मुंढेंच्या कामाला अनोख्या पद्धतीने सलाम, Video

Mumbai : ‘त्या’ फुटबॉल मैदानावर ‘एमएफए’चा अधिकार नाही; म्हाडाची उच्च न्यायालयात माहिती

Mumbai : पालिकेने SIR साठी मोजले १०.८१ कोटी रुपये; चार महिन्यांत १,३०४ डेटा एंट्री ऑपरेटरची नियुक्ती