पाटणा : महाराष्ट्राप्रमाणेच बिहारच्या निवडणुकीतही भाजपप्रणित एनडीए सरकारने घवघवीत यश मिळवले असले तरी बिहारच्या मुख्यमंत्रिपदावरून सस्पेन्स अद्याप कायम ठेवण्यात आला आहे. निवडणुकीआधीही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करण्यात न आल्याने आता भाजप नीतिशकुमारांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे मात्र बोलले जात आहे. नीतिशकुमार हेच सहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, असे जनता दल युनायटेडने (जदयू) म्हटले आहे. मात्र भाजपने अद्याप मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत चकार शब्दही काढलेला नाही. आमदारांच्या बैठकीत निर्णय घेणार, असे भाजप नेत्यांकडून म्हटले जात आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप पहिल्यांदाच ८९ जागा जिंकत एक क्रमांकचा पक्ष ठरला आहे. नीतिशकुमारांच्या जेडीयूला ८५ जागा जिंकता आल्या. एनडीएचा घटक पक्ष असलेल्या चिराग पासवान यांच्या एलजेपी (आरव्ही) पक्षाने १९ जागा जिंकत एनडीएचा आकडा २०० पार नेला. त्यामुळे, अधिक जागा जिंकूनही भाजप नितीश कुमारांना पुन्हा मुख्यमंत्रीपद देणार का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधनला फक्त ३५ जागांवर समाधान मानावे लागले. भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या तरी केंद्रात भाजप सरकारला नीतिशकुमार यांनी टेकू दिल्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेताना नीतिशकुमार यांना डावलणे शक्य वाटत नाही. नीतिशकुमारांची ढासळती तब्येत तसेच त्यांचे वय आणि भाजपचे धक्कातंत्र पाहता, सरकारने तब्बल ४० हजार कोटी रुपये खर्च करून मतखरेदी केली. लोकांच्याच पैशातून लोकांचीच मते खरेदी करण्यात आली."
महिलांना पैशांचे वाटप करणे योग्य आहे का ? - शरद पवार
ही निवडणूक महिलांनी हातात घेतली होती. सरकारने महिलांच्या खात्यात प्रत्येकी १० हजार रुपये टाकले. त्यामुळे महिलांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान केले. बिहारमधील एनडीएचा विजय हा त्याचा परिणाम असावा. महाराष्ट्रातही निवडणुकीच्या अगोदर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अधिकृतपणे पैसे वाटण्यात आले. एकंदर निवडणुकीच्या पद्धतीविषयी लोकांच्या मनात असलेल्या विश्वासालाच धक्का बसला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप करणे योग्य आहे का ? याचा विचार जाणकारांनी केला पाहिजे. निवडणूक आयोगानेही याचा विचार केला पाहिजे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस श.प. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
लालूंच्या मुलीचा राजकीय सन्यास
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची मुलगी तसेच तेजस्वी यादव यांची बहीण रोहिणी आचार्य यांनी राजकीय सन्यास घेत असल्याची घोषणा करत यादव कुटुंबासोबतचे संबंध तोडले आहेत. “मी राजकारण सोडत आहे आणि मी माझ्या कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे. संजय यादव आणि रमीज यांनी मला हेच करायला सांगितले होते. सगळ्या गोष्टींची जबाबदारी घेत आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.
अनियमिततेचे पुरावे दोन आठवड्यात मांडणार - काँग्रेस
बिहार विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीला राहुल गांधी, केसी वेणूगोपाल आणि अजय माकन उपस्थित होते. या बैठकीत संघटनात्मक त्रुटींवर चर्चा करतानाच, बिहारमध्ये इतका दारूण पराभव का सहन करावा लागला, याचा शोध घेतला जात आहे. काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल म्हणाले की, “पक्ष अनियमिततेचे पुरावे गोळा करत आहे आणि ते दोन आठवड्यांत देशासमोर सादर करेल."