राष्ट्रीय

Bihar Election 2025 : बिहारमध्ये रालोआचेच सरकार येणार; बहुतांश ‘एक्झिट पोल’मधील निष्कर्ष, महाआघाडी दुसऱ्या क्रमांकावर

बिहार विधानसभेसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडल्यानंतर अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मतदानोत्तर चाचण्यांचे निकाल उघड झाले असून जवळपास सर्वच ‘एक्झिट पोल’मध्ये बिहारमध्ये रालोआचीच सत्ता येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : बिहार विधानसभेसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडल्यानंतर अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मतदानोत्तर चाचण्यांचे निकाल उघड झाले असून जवळपास सर्वच ‘एक्झिट पोल’मध्ये बिहारमध्ये रालोआचीच सत्ता येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर इंडिया आघाडीतील पक्षांना दुसऱ्या क्रमांकाचे स्थान देण्यात आले असून निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा जनसुराज पक्ष तिसऱ्या स्थानावर असल्याचे चित्र दर्शविण्यात आले आहे.

‘एक्झिट पोल’मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सत्ता कायम राखणार, असा दावा करण्यात आला आहे. मात्र, राष्ट्रीय जनता दल (राजद) प्रणित इंडिया ब्लॉक नऊ वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या नितीश कुमार यांना सत्तेवरून खाली खेचण्यात यशस्वी होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

पीपल्स पल्स, पीपल्स इन्साईट, मॅट्रीझ, दैनिक भास्कर, मार्क व जेव्हीसी या कंपन्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा नितीश कुमार व भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीची निवड केली आहे.

पीपल्स पल्सच्या एक्झिट पोल्सनुसार, बिहारमध्ये एनडीएला १३३ ते १५९ जागा मिळून त्यांची सत्ता येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर महाआघाडीला ७५ ते १०१ आणि जनसुराज पक्षाला ० ते ५ जागा आणि इतर २ ते ८ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पीपल्स इन्साइट्स - एनडीए १३३ ते १४८, महाआघाडी ८७ ते १०२, जनसुराज पक्ष ० ते २ आणि इतर -३ ते ६.

पीपल्स इन्साइट्स - पक्षनिहाय एक्झिट पोल्स

एनडीएमध्ये भाजप - ६० ते ७२, जनता दल (संयुक्त) - ५५ ते ६०, लोकजनशक्ती पार्टी - ९ ते १२, हिंदुस्तान आवाम मोर्चा - १ ते २ आणि राष्ट्रीय लोक मोर्चा - ० ते २.

महाआघाडीमध्ये राष्ट्रीय जनता दल - ६५ ते ७२, काँग्रेस - ९ ते १३, डावे पक्ष - ११ ते १४, विकासशील इन्सान पार्टी - २ ते ३ आणि इंडियन इन्क्लुझिव्ह पार्टी - ०.

मॅट्रिझ एक्झिट पोल्सनुसार एनडीए - १४७ ते १६७ आणि महागठबंधन - ७० ते ९०.

पीपल्स पल्सच्या सर्वेक्षणानुसार मुख्यमंत्री म्हणून तेजस्वी यादव - ३२ टक्के, नितीश कुमार - ३० टक्के, प्रशांत किशोर - ८ टक्के, चिराग पासवान - ८ टक्के, सम्राट चौधरी - ६ टक्के, राजेश कुमार - २ टक्के आणि इतर - १४ टक्के असा पसंतीक्रम आहे.

दैनिक भास्करच्या एक्झिट पोल्सनुसार, एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता - एनडीए : १४५ ते १६०, महाआघाडी ७३ ते ९१, जनसुराज पक्ष : ० ते ३ आणि इतर : ५ ते ७.

डीव्ही रीसर्चच्या पोलनुसार, एनडीए : १३७ ते १५२, महाआघाडी ८३ ते ९८, जनसुराज पक्ष : ० ते ४ आणि इतर : २ ते ३.

पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार, एनडीए : १८४ ते २०९, महाआघाडी ३२ ते ४९, इतर : १ ते ५.

६७.१४ टक्के विक्रमी मतदान

बिहार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी संपले असून या टप्प्यात रेकॉर्डब्रेक मतदान झाले. आज बिहारमध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६७.१४ टक्के मतदान झाले आहे, हा आकडा ७० टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात ६५ टक्क्यांच्या आसपास मतदान झाले होते. यामुळे सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Mumbai : सँडहर्स्ट रोड रेल्वे दुर्घटनेला जबाबदार कोण? ५ दिवस उलटले तरी FIR नाही

मुंबईत शुक्रवारी पाणीपुरवठा बंद; कुर्ला, चेंबूर, घाटकोपर व माटुंगा विभागातील काही परिसरांना झळ बसणार

अचानक बेशुद्ध पडल्याने अभिनेता गोविंदा रुग्णालयात दाखल

मुंबई मनपा आरक्षण सोडतीत दिग्गजांना धक्का; राज्यातील २९ मनपांतील आरक्षण सोडत जाहीर, मुंबई महापालिकेत येणार महिलाराज

ठाणे महापालिकेत ‘महिलाराज’; ६६ महिलांना आरक्षणाचा लाभ, ३३ प्रभागांची रचना निश्चित