राष्ट्रीय

UPI वापरकर्त्यांना 'पिन'ऐवजी चेहरा, बोटाचा ठसा सक्तीचा; NPCI ची मंजुरी; आजपासून बायोमेट्रिक प्रणाली सुरू होणार

भारतामध्ये सध्या प्रत्येकजण पेमेंटसाठी ‘यूपीआय’ वापरतो आणि त्यासाठी पिन टाकावा लागतो. आता ‘यूपीआय’ व्यवहार करताना ग्राहकांना चेहरा किंवा बोटांचे ठसे देणे सक्तीचे होण्याची शक्यता आहे. ही बायोमेट्रिक प्रणाली बुधवारपासून लागू होऊ शकते.

Swapnil S

मुंबई : भारतात सध्या प्रत्येक जण दुसऱ्याला पेमेंट करताना ‘यूपीआय’ पेमेंट करतो. हे पेमेंट करताना ‘यूपीआय’धारकांना ‘पिन’ टाकावा लागतो. आता हे ‘यूपीआय’ व्यवहार करताना ग्राहकांना चेहरा किंवा बोटांचे ठसे सक्तीचे होण्याची चिन्हे आहेत. बुधवारपासून ही बायोमेट्रिक प्रणाली सक्तीची होण्याची शक्यता आहे. ‘यूपीआय’वर नियंत्रण ठेवणाऱ्या ‘एनपीसीआय’ने बायोमेट्रिक फिचर्सना मंजुरी देण्याची तयारी पूर्ण केली आहे. ही मंजुरी मिळाल्यानंतर ‘यूपीआय’ पेमेंट करण्यासाठी ‘पिन’ची गरज पर्यायी राहील.

बायोमेट्रिक पेमेंट करायला आता बोटांचे ठसे, चेहरा आदींची गरज लागणार आहे. हे पिन किंवा पासवर्डपेक्षा अधिक सुरक्षित असतील. त्याची नक्कल करणे कठीण बनेल. आपण सध्या स्मार्टफोनला बोटांचे ठसे किंवा चेहऱ्याचा वापर करून अनलॉक करतो. आता नवीन पद्धतीनुसार, तुमच्या पेमेंटला मंजुरी मिळण्यासाठी तुमचा डेटा हा आधार कार्डमधील बायोमेट्रीक माहितीसोबत पडताळून पाहिला जाईल.

सर्वच ‘यूपीआय ॲॅप’मध्ये लागणार

ही बायोमेट्रीक प्रणाली सर्वच ‘यूपीआय’मध्ये सहाय्य ठरेल. सुरुवातीला गुगल पे, फोन-पे, पेटीएम आदी मोठ्या ‘यूपीआय ॲॅप्स’मध्ये हे फीचर पाहायला मिळेल.

घोटाळ्याचे प्रमाण कमी होणार

‘पिन’च्या तुलनेत बायोमेट्रिक प्रणालीमुळे घोटाळ्याचा धोका कमी होणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील डिजीटल पेमेंट वाढीस लागेल. कारण ‘पिन’ सातत्याने लक्षात ठेवणे व टाईप करणे कठीण असते. मुंबईत सुरू असलेल्या ग्लोबल फिनटेक महोत्सवात हे नवे बायोमेट्रिक फीचर जगासमोर आणले जाणार आहे.

Shiv Sena Symbol Dispute: सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणीवर; आता १२ नोव्हेंबरला फैसला?

नवी मुंबई विमानतळाचे आज PM नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन; भारताच्या पहिल्या ‘पूर्ण डिजिटल’ एअरपोर्टची १० वैशिष्ट्ये

कन्फर्म तिकीट पण प्लॅन बदलला? टेन्शन नको! आता ‘डेट चेंज’ची मोफत सोय; रेल्वेचा नवा नियम

नवी मुंबई एअरपोर्टसाठी नवे इमिग्रेशन चेकपोस्ट; २८५ नवीन पोलीस पदांना मंजुरी, प्रतिनियुक्तीवर इच्छुक कर्मचाऱ्यांचे मागवले अर्ज

तीन अमेरिकन शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्राचे नोबेल; क्वांटम टनेलिंगवरील शोधाबद्दल पुरस्कार