संग्रहित छायाचित्र 
राष्ट्रीय

ममता बॅनर्जी यांना निवडणूक प्रचाराला बंदी करा; भाजपची निवडणूक आयोगाकडे मागणी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसचे नेते यांना निवडणूक प्रचाराला बंदी करण्याची मागणी भाजपने केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला मतदान करण्यापासून रोखण्यासाठी हे नेते मतदारांना "धमकावत" असल्याचा आरोप करत भाजपने सोमवारी निवडणूक आयोगाकडे दाद मागितली.

Swapnil S

नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसचे नेते यांना निवडणूक प्रचाराला बंदी करण्याची मागणी भाजपने केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला मतदान करण्यापासून रोखण्यासाठी हे नेते मतदारांना "धमकावत" असल्याचा आरोप करत भाजपने सोमवारी निवडणूक आयोगाकडे दाद मागितली.

भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या निवेदनात, ममता बॅनर्जी यांना निवडणूक प्रचारापासून भाग घेण्यावर बंदी घालण्याची आणि तृणमूलच्या नेत्यांविरुद्ध फिर्याद नोंदवण्याचे आदेश देण्याची विनंती केली.केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, पीयूष गोयल आणि सुकांत मुजुमदार, पक्षाचे मुख्य प्रवक्ते अनिल बलूनी आणि राज्यसभा खासदार अरुण सिंग यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाच्या कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेतली. पश्चिम बंगालमधील पोलीस प्रशासन सत्ताधारी पक्षाला साथ देत असून ते "अकार्यक्षम" ठरले आहेत, असा दावा करत भाजपने "संवेदनशील आणि असुरक्षित भागांत" केंद्रीय दलांच्या जादा तुकड्या तैनात करण्याची मागणीही केली आहे.

"निवडणुकीनंतर नागरिकांना त्यांच्या घराबाहेर 'मी भाजपला पाठिंबा देत नाही' असे पोस्टर्स लावण्यास भाग पाडले जाईल, असे विधान ममता बॅनर्जी यांनी २५ मार्च रोजी मैनागुरी येथील सभेत केले होते. हे विधान राजकीय अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट गदा आणणारे आहे," असे भाजपने निवेदनात म्हटले आहे. राज्य प्रशासन आणि पोलीस निष्पक्षपणे वागतील याची खात्री करण्यासाठी अधिक आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करावी, असे या निवेदनात म्हटले आहे. उत्तर बंगाल आणि इतर भागांतील सभांमध्ये ममता बॅनर्जी यांनी केलेली विधाने ही मतदारांना धमकावणारी आणि हिंसाचाराला चिथावणी देणारी आहेत, असा दावा या नेत्यांनी केला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि खासदार महुआ मोइत्रा यांच्या वक्तव्यांमुळे आचारसंहितेचे आणि 'भारतीय न्याय संहिते'च्या विविध कलमांचे उल्लंघन झाले आहे, असेही त्यांचे म्हणणे आहे. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना किरेन रिजिजू म्हणाले, "ममता बॅनर्जी आणि त्यांचे मंत्री मतदारांना गंभीर परिणामांची भीती दाखवत आहेत. भाजपला मतदान करणाऱ्यांना सोडले जाणार नाही, अशा धमक्या दिल्या जात आहेत. आपला पराभव समोर दिसत असल्याने नैराश्यातून टीएमसी हे कृत्य करत आहे."

तरच LPG सिलिंडर सेवा बंद; PNG नियमावर भुजबळांचे स्पष्टीकरण

राज्यात ठिकठिकाणी अवकाळी सरी; पुणे, पिंपरी - चिंचवड, वाशिममध्ये पाऊस; वातावरणात गारवा, पण शेतीचे नुकसान

तेलंगण सरकारचा कठोर कायदा! आई-वडिलांची उपेक्षा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात १५ टक्के कपात

उपसभापती गोऱ्हे यांची SIT चौकशी करा; खरात प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांची मागणी

अफगाणिस्तानमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार; पूर आणि भूस्खलनामुळे १७ ठार, २६ जखमी