राष्ट्रीय

भाजपला कमलनाथ यांची गरज नाही; मध्य प्रदेशचे मंत्री कैलाश विजयवर्गीय यांचा निर्वाळा

आता ७७ वर्षांच्या ज्येष्ठ काँग्रेस नेते कमलनाथ यांच्या पुढील राजकीय वाटचालीबद्दल आणखी संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.

Swapnil S

जबलपूर : भाजपला कमलनाथ यांची गरज नाही आणि आमचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद आहेत, असे स्पष्ट सांगत मध्य प्रदेशचे मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी कमलनाथ यांच्या भाजप प्रवेशाच्या अटकळींसंबंधात पडदा पाडला आहे. यामुळे आता ७७ वर्षांच्या ज्येष्ठ काँग्रेस नेते कमलनाथ यांच्या पुढील राजकीय वाटचालीबद्दल आणखी संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.

पत्रकारांशी बोलताना विजयवर्गीय यांनी ही माहिती दिली. माजी खासदार व मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमल नाथ आणि त्यांचे खासदार पुत्र नकुल नाथ गेल्या आठवड्यात नवी दिल्लीत पोहोचल्यापासून भाजप प्रवेशाबद्दल अटकळ सुरू आहे. तथापि, नाथांचे विश्वासू सज्जन सिंग वर्मा यांनी ७७ वर्षीय काँग्रेसचे दिग्गज नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला होता. दरम्यान, कमलनाथ पुढच्या राजकीय वाटचालीबाबत ‘सस्पेंस’ असताना, त्यांच्या छिंदवाडा जिल्ह्यातील पक्षाच्या अनेक स्थानिक नेत्यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला.

INS Udaygiri: ‘उदयगिरी’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात; स्वीकृती दस्तावेजावर स्वाक्षरी, बघा काय आहे खासियत?

कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्र सरकारची मंजुरी; प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पालिका करणार हायकोर्टात अर्ज

पुण्यातील नद्यांच्या पूररेषा नव्याने आखाव्यात; ४ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

Dombivli : ''घरी कोणीही नाही, फाशी घे''...तरुणीचा WhatsApp मेसेज अन् तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; गुन्हा दाखल

१ ऑगस्टपासून ‘ईएलआय’ लागू होणार; दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणार; योजनेला केंद्र सरकारची मंजुरी