भाजपने भाकरी फिरवली, संघटनेत खांदेपालट (संग्रहित छायाचित्र)
राष्ट्रीय

भाजपने भाकरी फिरवली, संघटनेत खांदेपालट

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी २८ राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशांसाठी प्रभारी आणि सह प्रभारींची नियुक्ती केली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी २८ राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशांसाठी प्रभारी आणि सह प्रभारींची नियुक्ती केली आहे. भाजपाच्या दिल्लीचे प्रभारी म्हणून विनय सहस्रबुद्धे यांची नियुक्ती करण्यात आली असून पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून तर जगदीश पटेल, मेधा कुलकर्णी, प्रदीप वर्मा आणि आनंद यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, बैजयंत 'जय' पांडा यांना महाराष्ट्राचे प्रभारी बनवण्यात आले आहे.

भाजपाने याव्यतिरिक्त संजय भाटिया यांची राजस्थानचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली असून, कविता पाटीदार आणि कुलजीत चहल यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राम माधव यांची तामिळनाडूसाठी, राजदीप रॉय यांची मणिपूरसाठी, डी. पुरंदेश्वरी यांची ओडिशासाठी, सुनील बन्सल यांची तेलंगणा आणि पश्चिम बंगालसाठी, बिप्लब देब यांची मध्य प्रदेशसाठी आणि भारती पवार यांची गोव्यासाठी भाजप प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. भाजपने सतीश पुनिया यांची पंजाब आणि जम्मू-काश्मीरचे प्रभारी म्हणूनही नियुक्ती केली.

स्मृती इराणी बनल्या हरियाणा, छत्तीसगडच्या प्रभारी

त्याचप्रमाणे स्मृती इराणी यांची हरियाणा आणि छत्तीसगडसाठी भाजपा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर हरीश द्विवेदी यांची बिहार आणि कर्नाटकसाठी आणि तरुण चुघ यांची गुजरातसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. अनिल बालुनी यांची भाजपाच्या आयटी सेलचे समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आणि आशिष अग्रवाल यांची संयोजक म्हणून निवड करण्यात आली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : एफडीएने ४३ परवाने केले निलंबित; १७.८ टन साठा केला जप्त, दिवाळीत FDA ची मोठी कारवाई

दिवाळीच्या मुहूर्तावर कतरिना-विकीने पहिल्यांदाच दाखवला मुलाचा चेहरा! छोट्या विहानच्या गोड फोटोने वेधलं लक्ष

Mumbai : पावसासंबंधी माहिती वॉलवर; मुख्यालयासह परळ येथील नियंत्रण कक्ष होणार हायटेक

Mumbai : स्थायी समितीत जोरदार आतषबाजी; आधी खर्च, नंतर मंजुरी; स्थायी समितीत ५ ते ७५ लाखांचे ९० टक्के प्रस्ताव

Mumbai : केईएमचा ४२२ कोटींचा शैक्षणिक संकुल प्रकल्प; BMC डिसेंबरमध्ये काढणार निविदा