(संग्रहित छायाचित्र)
राष्ट्रीय

केरळ, आसाम विधानसभेसाठी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर

भाजपने आगामी आसाम आणि केरळ विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. केरळ विधानसभेसाठी भाजपने आपल्या ३९ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. तर आसाम विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या ८८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली: भाजपने आगामी आसाम आणि केरळ विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. केरळ विधानसभेसाठी भाजपने आपल्या ३९ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. तर आसाम विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या ८८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

दरम्यान, केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या विरोधात भाजपने धर्मदम मतदारसंघातून के. रंजीत यांना उमेदवारी दिली आहे. तर मिझोरामचे माजी राज्यपाल कुम्मनम राजशेखरन यांना अरनमुलामधून उमेदवारी देण्यात आली आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांनी आज धर्मदम विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

भाजपने कासारगोडमधून अश्विनी एमएल, एर्नाकुलममधून पीआर शिवशंकर, परावूरमधून वत्सला प्रसन्न कुमार आणि कोंगडमधून रेणू सुरेश यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने केरळ विधानसभा निवडणुकीसाठी १९ मार्चला ४७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यामध्ये नेमोम मतदारसंघातून पक्षाध्यक्ष राजीव चंद्रशेखर आणि कझाकुट्टम मतदारसंघातून माजी केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या उमेदवारीचा समावेश आहे.

आसाम ८८ उमेदवार

दुसरीकडे, भाजपने गुरुवारी आसाम विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या ८८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. जलुकबारी जागेसाठीच्या यादीत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या नावाचा समावेश आहे. पक्षाने दिसपूर विधानसभा जागेसाठी काँग्रेसचे माजी नेते प्रद्युत बोरदोलोई यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारांच्या यादीनुसार, नुकतेच काँग्रेस सोडून भाजपमध्ये सामील झालेले भूपेन कुमार बोरा बिहपुरा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ २३ मे रोजी संपणार आहे.

सोने-चांदी बाजारात मोठी घडामोड? अमेरिकी रोजगार आकडेवारी, इराणमधील तणावाचा परिणाम जाणवणार

Ganeshotsav 2026 : गणपतीला कोकणात जाताय? रेल्वे स्थानकावर शेवटच्या क्षणी धावपळ नको; मध्य रेल्वेने दिल्या 'या' महत्त्वाच्या सूचना

CJP Protest : ५ सप्टेंबरच्या मोर्चाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; कायद्याचे पालन करण्याचे निर्देश

Nepal Floods : महापुरात गावं वाहून गेली, तरी 'ते' घर तग धरून उभं! काय आहे यामागचं रहस्य?

Delhi Crime : मदतीच्या बहाण्याने बसमध्ये घेतलं अन्...; १६ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार, चालक-कंडक्टर अटकेत