केजरीवालांनी नवा शीशमहल बांधला; भाजपची टीका 
राष्ट्रीय

केजरीवालांनी नवा शीशमहल बांधला; भाजपची टीका

एकीकडे आम आदमी पक्षाच्या सात राज्यसभा खासदारांनी पक्ष सोडला असतानाच भाजपने आता अरविंद केजरीवाल यांच्यावर नव्याने हल्ला चढवला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली: एकीकडे आम आदमी पक्षाच्या सात राज्यसभा खासदारांनी पक्ष सोडला असतानाच भाजपने आता अरविंद केजरीवाल यांच्यावर नव्याने हल्ला चढवला आहे. भाजप नेते परवेश साहिब सिंह वर्मा यांनी माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या ९५ लोधी इस्टेट येथील नवीन सरकारी बंगल्यावर कडाडून टीका केली आहे. वर्मा यांनी या बंगल्याला 'शीशमहल भाग २' असे संबोधले.

केजरीवाल यांनी दिल्लीच्या जनतेचा विश्वासघात केला आहे. ज्यांनी साधेपणाचे आश्वासन दिले होते, ते आता ५ बेडरूमच्या आलिशान बंगल्यात राहत आहेत, ज्याचा बेडरूम गोव्यातील ७स्टार हॉटेलसारखा दिसतो. या बंगल्याच्या सजावटीसाठी खासगी पैसा वापरण्यात आला आहे, असा दावाही वर्मा यांनी केला.

यापूर्वीच्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत केजरीवाल यांच्या मुख्यमंत्री निवासस्थानाचा उल्लेख शीशमहल असा करून भाजपने जोरदार प्रचारमोहीम राबवली होती. या बंगल्यावर करोडो रुपये खर्च केले गेले असा भाजपचा आरोप होता.

दरम्यान, दिल्लीच्या विरोधी पक्षनेत्या आणि आप नेत्या आतिशी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. 'परवेश वर्मा यांनी प्रसिद्ध केलेले सर्व फोटो बनावट आहेत,' असे त्यांनी स्पष्ट केले. आतिशी यांनी नायब राज्यपाल आणि भाजप नेत्या रेखा गुप्ता यांना खुले आव्हान दिले की, "त्यांनीही आपली घरे लोकांसाठी उघडी करावीत आणि केजरीवालही त्यांचे घर उघडतील, मग जनतेलाच ठरवू द्या की कोणाचे घर जास्त आलिशान आहे."

कोकण हापूसची आवक वाढली; दरात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा

जप्त केलेल्या नोटा उंदरांनी कशा कुरतडल्या? सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आश्चर्य

के. कविता यांचा नवा राजकीय पक्ष; 'तेलंगणा राष्ट्र समिती' नावाने वडिलांनाच दिले आव्हान

सिंधुदुर्गातील 'MH-०७' क्रमांकाच्या वाहनांना टोल नाही; पालकमंत्री नितेश राणे यांचा जिल्हावासीयांना दिलासा

ठाण्याची झणझणीत मामलेदारची मिसळ इतिहासजमा; तहसील कार्यालय परिसराच्या पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर इमारत जमीनदोस्त