संग्रहित छायाचित्र 
राष्ट्रीय

बंगालमध्ये २०२६ साली भाजप सत्तेवर येणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा विश्वास

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी कोलकाता येथे भाजपच्या सदस्यत्व मोहिमेला सुरुवात केली.

Swapnil S

कोलकात्ता : पश्चिम बंगालमध्ये आज रविंद्र संगीताऐवजी बॉम्बचे आवाज ऐकू येत आहेत. राज्य सरकार बंगालमध्ये घुसखोरांना थारा देत आहे. मात्र, २०२६ मध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजपच सत्तेवर येईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी कोलकाता येथे भाजपच्या सदस्यत्व मोहिमेला सुरुवात केली. सुवेंदू अधिकारी आणि मिथुन चक्रवर्तीही या कार्यक्रमात उपस्थित होते.

ते म्हणाले की, गाय आणि कोळशाची तस्करी रोखण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये भाजपचे एक कोटी सदस्य करावे लागतील. २०२६ मध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील. तेव्हा भाजप दोन तृतीयांश बहुमताने सरकार स्थापन करेल. भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर पश्चिम बंगाल कम्युनिस्ट आणि ममतादीदींच्या दहशतीतून मुक्त होईल.

शहा म्हणाले की, बंगालमध्ये माता-भगिनींच्या प्रतिष्ठेवर आघात होत आहेत. संदेशखाली येथील महिलांवर झालेल्या हल्ल्याच्या घटना आणि आरजी कर हॉस्पिटलमधील डॉक्टरवरील बलात्कार आणि खून या घटना याचा पुरावा आहे.

शहा यांनी पश्चिम बंगालच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, मिथुन चक्रवर्ती यांनी मला सांगितले की, टीएमसी कार्यकर्ते भाजप समर्थकांना मतदान करू देत नाहीत.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या २९४ जागा आहेत. २०२१च्या निवडणुकीत टीएमसीला २१३ जागा मिळाल्या होत्या, तर भाजपला ७७ जागा मिळाल्या होत्या.

लोकसभा निवडणुकीत बंगालमध्ये भाजपला १२ जागा

पश्चिम बंगालमध्ये यंदा लोकसभेत ४२ जागांपैकी तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) २९ जागा जिंकल्या, तर भाजपला केवळ १२ जागा जिंकता आल्या.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी