ANI
राष्ट्रीय

भाजपच्या परिवर्तन यात्रेची सुरुवात छत्तीसगडमधून ;अमित शहा आणि जे.पी.नड्डा यांच्या हस्ते शुभारंभ

यात्रेदरम्यान काँग्रेस राजवटीतील सरकारचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यावर भर देण्यात येणार आहे.

नवशक्ती Web Desk

रायपूर : भाजप आजपासून (मंगळवार) परिवर्तन यात्रा सुरू करणार आहे. याची सुरुवात विधानसभा तोंडावर असलेल्या छत्तीसगड राज्यापासून करण्यात येणार आहे. या राज्यात विधानसभेच्या एकूण ९० जागा असून त्यापैकी ८७ मतदारसंघांतून परिवर्तन यात्रा काढण्यात येणार आहे. यात्रेदरम्यान काँग्रेस राजवटीतील सरकारचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यावर भर देण्यात येणार आहे. त्याचवेळी केंद्र सरकारच्या जनकल्याण योजना आणि धोरणांचा प्रसार करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या यात्रेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

यात्रा सुरू करण्यापूर्वी अमित शहा दांतेवाडा येथील मां दांतेश्वरी देवीची विधिवत पूजाअर्चा करणार आहेत. त्यानंतर तेथे एक जनसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. यानंतर दुसऱ्या परिवर्तन यात्रेची सुरुवात भाजप पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते १५ सप्टेंबर रोजी उत्तर छत्तीसगडमधील जशपूर येथे करण्यात येणार आहे. भाजप राज्य प्रभारी ओम माथूर तसेच विभागीय सचिव अजय जमवाल आणि राज्य महासचिव पवन सार्इ सोमवारी बस आणि वाहनांची पूजा करून यात्रेची सुरुवात करतील. राज्यातील कुशाभाऊ ठाकरे परिसरातून या यात्रेला सुरुवात होईल. याच परिसरात छत्तीसगड भाजपचे मुख्यालय आहे. भाजपने विकास यात्रेसाठी वापरलेली आलिशान बस या यात्रेसाठी वापरण्यात येणार आहे. २०१८ साली भाजप सत्तेत असताना ही बस वापरण्यात आली होती.

या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यापासून एलइडी स्क्रीन तसेच हायड्रॉलिक लिफ्ट अशा आधुनिक सुविधा आहेत. या लिफ्टमध्ये उभे राहून नेत्यांना भाषण करता येणार आहे. बस भगव्या रंगाची असून त्यावर निळे व हिरवे पट्टे आहेत. तसेच बसवर मोदी, नड्डा, राज्यातील नेते अरुण साव, माजी मुख्यमंत्री रामन सिंग यांची छायाचित्रे रंगवण्यात आली आहेत. तसेच केंद्रीय मंत्री रेणुका सिंग, राष्ट्रीय उपाध्यक्ष सरोज पांडे आणि लता उसेंडी यांची छायाचित्रे देखील बसवर रंगविण्यात आली आहेत.

BMC Election 2026 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर ; एकूण ९४ शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात, वाचा सर्व उमेदवारांची नावे

BMC Election 2026 : शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार ठरले; कोणत्या प्रभागात कोणाला संधी?

आधी लाथा-बुक्क्या, आता जादू की झप्पी; व्हायरल झालेल्या 'त्या' डॉक्टर आणि पेशंटचं भांडण मिटलं, नेमकं प्रकरण काय?

'मला सतत मेसेज करायचा'...; सूर्यकुमार यादवबाबत खळबळजनक दावा करणारी खुशी मुखर्जी कोण?

चीनचा तीळपापड! 'इतिहास बदलू शकत नाही'; सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान'चा ट्रेलर बघून तीव्र प्रतिक्रिया