राष्ट्रीय

भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले

राजस्थानमधील जैसलमेरमधील सादेवाला भागात भारत-पाकिस्तान सीमेजवळ एका मुलाचा आणि मुलीचा मृतदेह सापडला आहे. हे मृतदेह सुमारे ६-७ दिवसापूर्वीचे आहेत. मृतदेहांजवळ पाकिस्तानी सिम कार्ड आणि ओळखपत्रे सापडली आहेत त्यामुळे हे दोघेही पाकिस्तानी असल्याचे समोर आले आहे.

Swapnil S

जेलसमेर : राजस्थानमधील जैसलमेरमधील सादेवाला भागात भारत-पाकिस्तान सीमेजवळ एका मुलाचा आणि मुलीचा मृतदेह सापडला आहे. हे मृतदेह सुमारे ६-७ दिवसापूर्वीचे आहेत. मृतदेहांजवळ पाकिस्तानी सिम कार्ड आणि ओळखपत्रे सापडली आहेत त्यामुळे हे दोघेही पाकिस्तानी असल्याचे समोर आले आहे.

हे दोन्ही मृतदेह भारत-पाकिस्तान सीमेच्या कुंपणाच्या आत सुमारे १० ते १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या भारतीय सीमेवरील साडेवाला परिसरात आढळले. तनोट पोलिसांनी दोन्ही मृतदेह रामगड सीएचसीच्या शवागारात ठेवले आहेत. दोघांच्याही मृत्यूचे कारण शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होईल. हे दोघेही भारतातील आहेत की पाकिस्तानी आहेत याचा तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

या दोघांच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या तरुणाचे नाव रवी कुमार वडिलांचे नाव दिवान जी, तर मुलीच्या कार्डवर शांती बाई असे नाव आहे. मुलगी अल्पवयीन असल्याचे सांगितले जात आहे. दोघेही एकाच जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातील रहिवासी आहेत.

नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील रहेजा रेसिडेन्सीला भीषण आग; ६ वर्षांच्या चिमूरडीसह ४ जणांचा मृत्यू, १० जखमी

मुंबईकरांनो सावधान! हवेची गुणवत्ता ढासळली, प्रदूषणात होतेय वाढ, AQI १६४ वर पोहोचला

समुद्रकिनारे धोक्यात! CRZ ‘बफर झोन’ ५०० वरून २०० मीटर करण्याचा नीती आयोगाचा प्रस्ताव, पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली नाराजी

अंदमान-निकोबार बेटांवर चक्रीवादळ धडकणार; हवामान खात्याचा इशारा

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी दिल्लीतील हवा ‘अतिशय खराब’; दिल्लीकरांनी घेतला विषारी श्वास, हवेचा एक्यूआय ३०० च्या पुढे