राष्ट्रध्वजाचा अवमान प्रकरण : वृद्धाचा गुन्हा आठ वर्षानंतर रद्द प्रातिनिधिक छायाचित्र
राष्ट्रीय

राष्ट्रध्वजाचा अवमान प्रकरण : वृद्धाचा गुन्हा आठ वर्षानंतर रद्द

राष्ट्रध्वज उलटा फडकवून त्याचा अपमान केल्याचा आरोप असलेल्या ८५ वर्षांच्या व्यक्तीला हायकोर्टाने मोठा दिलासा दिला. न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या एकलपीठाने ध्वजाचा अनादर करण्याचा गुन्हा करण्यासाठी, हे कृत्य जाणूनबुजून करणे आवश्यक आहे...

Swapnil S

मुंबई : राष्ट्रध्वज उलटा फडकवून त्याचा अपमान केल्याचा आरोप असलेल्या ८५ वर्षांच्या व्यक्तीला हायकोर्टाने मोठा दिलासा दिला. न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या एकलपीठाने ध्वजाचा अनादर करण्याचा गुन्हा करण्यासाठी, हे कृत्य जाणूनबुजून करणे आवश्यक आहे. त्यामुळे तिरंगा फडकवण्याच्या ठिकाणी आरोपीची उपस्थिती ही राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा ठरणार नाही, असे स्पष्ट करत आठ वर्षांपूर्वी दाखल केलेला गुन्हा रद्द केला.

२०१७ मध्ये यजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी गृहनिर्माण संस्थेच्या आवारात एकत्र आले आणि तिरंगा फडकवला. मात्र सायंकाळी या परिसरात गस्त घालणाऱ्या पोलिसांना तिरंगा उलटा फडकवल्याचे लक्षात आल्यानंतर याचिकाकर्ता आणि सोसायटीतील इतर पाच रहिवाशांविरुद्ध राष्ट्रीय सन्मान अपमान निवारण अधिनियम कायद्याच्या तरतुदींनुसार टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

आपण ज्येष्ठ नागरिक असून आजारांनी आपल्याला ग्रासले आहे. आपण ध्वजवंदनाच्या समारंभाला उपस्थित होतो. तसेच गृहनिर्माण संस्थेच्या ज्या भागात ध्वज फडकवला तो भाग सार्वजनिक जागेत येत नसल्याचा दावा करत गुन्हा रद्द करावा, अशी याचिका दाखल केली.

या याचिकेवर न्या. अश्विन भोबे यांच्या एकलपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने ध्वजवंदनाच्या कार्यक्रमात तिरंगा उलटा फडकवला आणि या समारंभाला याचिकाकर्त्यांची पस्थिती होती म्हणून तो गुन्हा ठरत नाही, असे निरीक्षण नोंदविताना कृत्य राष्ट्रध्वजाच्या सन्मानाचा अपमान करण्यासाठी किंवा त्याचा अनादर करण्यासाठी केल्याचे दर्शविणारी कोणतीही सामग्री सादर केली गेलेली नाही.

राज्यातील २६५ तालुक्यांत कोरडा दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

सोनं-दागिने दाखवत बनवायची Reel; चोरट्यांनी VIDEO पाहून साधली संधी, घरातून १ कोटींचा ऐवज लंपास

Noida Bus Fire : 'ती उतरल्यावरच मी उतरेन'; जळत्या बसमधून स्वतःचा जीव वाचवण्याऐवजी आईसोबत थांबला, मायलेकांचा करुण अंत

Mumbai : बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत कार घुसली; ४ भाविक जखमी, संतप्त जमावाकडून गाडीची तोडफोड, VIDEO

शिवनेरीचे तिकीट आता व्हॉट्सॲपवरून बुक करता येणार; दादर-पुणे शिवनेरीसाठी एसटी महामंडळाची प्रायोगिक सुविधा