पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रिक्स समिटसाठी सध्या जोहान्सबर्गमध्ये आहेत. याच ठिकाणाहून ते 'चांद्रयान ३' च्या लँडिंगचा सोहळा लाईव्ह पाहणार आहेत. देशासाठी हा सोहळा अभिमानाचा क्षण असणार आहे. ब्रिक्स समिट दरम्यान पंतप्रधान मोदींच्या एका कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला अभिमान वाटेल, अशी कृती मोदींनी केली आहे.
जोहान्सबर्गमध्ये सध्या ब्रिक्स परिषद सुरु आहे. या परिषदेत भारताचाही समावेश असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जोहान्सबर्गच्या दौऱ्यावर आहेत. परिषदेची बैठक झाल्यानंतर अनेक देशांच्या प्रमुखांचा ग्रुप फोटो काढण्याचा कार्यक्रमक सुरु होता. त्यावेळी मोदी स्टेजवर गेले .तेव्हा तिथं छोट्या आकारातील भारताचा राष्ट्रध्वज स्टेजवर पडल्याचं त्यांना दिसताच त्यांनी तो जमिनीवर पडलेल्या राष्ट्रध्वज उचलला आणि आपल्या कोटच्या खिशात ठेवला.
इतरही अनेक देशांचे राष्ट्रध्वजही स्टेजवर पडले होते. यावेळी मोदींसोबत दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरील रामाफोसा हे देखील फोटोसाठी जात असताना त्यांनाही त्यांच्या देशाचा झेंडा जमिनीवर पडलेला दिसला. मोदींची हे कृत्य पाहिल्यानंतर त्यांनीही त्यांचा राष्ट्रध्वज आपल्या हातानं उचलला त्यानंतर समोरुन एका मदतनीस आला आणि त्याने तो झेंडा आपल्याकडं देण्याची विनंती केली. त्यांनी तो ध्वज मदतनीसच्या हातात दिला. पंतप्रधान मोदींनी मात्र झेंडा मदतनीसकडे न देता आपल्याच खिशात ठेवला. नरेंद्र मोदींच्या या कृतीचा व्हिडिओ पीटीआयनं ट्विट केला असून या व्हिडिओवर अनेकांनी मोदींच्या कृतीचं मानपासून कौतुक केलं आहे. "नरेंद्र मोदींकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे", असंही एकानं म्हटलंय. त्याचा हा व्हिडिओ सगळीकडे चर्चेत आला असून नरेंद्र मोदींचे लोक कौतुक करताना दिसत आहेत.