ब्रेडमध्ये केवळ ६२ टक्के गव्हाचा वापर; CCPA चा ब्रिटानियाला लाखाचा दंड X
राष्ट्रीय

ब्रेडमध्ये केवळ ६२ टक्के गव्हाचा वापर; CCPA चा ब्रिटानियाला लाखाचा दंड

'१००% संपूर्ण गव्हाचा ब्रेड' असा दिशाभूल करणारा जाहिरात केल्याप्रकरणी मध्यवर्ती ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेडवर १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर प्रत्यक्ष उत्पादनात गव्हाचे प्रमाण केवळ ६२ टक्के असल्याचे उघडकीस आले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : '१००% संपूर्ण गव्हाचा ब्रेड' असा दिशाभूल करणारा जाहिरात केल्याप्रकरणी मध्यवर्ती ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ब्रिटानिया इंडस्ट्रीज लिमिटेडवर १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर प्रत्यक्ष उत्पादनात गव्हाचे प्रमाण केवळ ६२ टक्के असल्याचे उघडकीस आले आहे.

मुख्य आयुक्त निधी खरे यांच्या नेतृत्वाखालील सीसीपीएने २२ ऑक्टोबर रोजी दिलेल्या आदेशात कंपनीला प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच सोशल मीडियासह सर्व माध्यमांमधून ही जाहिरात तातडीने बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. ब्रिटानियाला १५ दिवसांच्या आत अनुपालन अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. जाहिरातीत '१००%' असा दावा केला असताना उत्पादनाच्या पॅकेजिंगवर गव्हाचे प्रमाण ६२ टक्के असल्याचे नमूद केले गेल्याचे लक्षात आल्यानंतर नियामकाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली.

आदेशात म्हटले आहे की, सध्याच्या प्रकरणात उत्पादनात केवळ ६२% संपूर्ण गहू आहे, तर उर्वरित ३८% भागामध्ये तांदळाचा कोंडा आणि इतर घटकांचा समावेश आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेच्या कनेक्टिंग लिंकवर मालवाहू वाहनांना बंदी; १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी

पुढील शैक्षणिक वर्षापासून सर्व CET वर्षातून दोनदा; १४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ

ठाण्यात मेट्रोचा पहिला टप्पा डिसेंबरपासून सुरू होणार; गायमुख ते कॅडबरी जंक्शन मेट्रो धावणार

आता १०० टक्के शुद्ध इथेनॉल; सरकारने E100 इंधनाला दिली मंजुरी

राज्य सरकार इस्टेट एजंट झाले आहे का? कांदळवन बचाओ मोहीम राबवणार; जितेंद्र आव्हाड यांची टीका