राष्ट्रीय

कॅप्टन अमरिंदर होणार जम्मू-काश्मीरचे राज्यपाल

मोदी आपले पत्ते कधीच उघडे करीत नाही

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : पुढील एप्रिल महिन्यात येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये संघटनात्मक बदलांसह केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याचे संकेत मिळत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी काही राज्यांचे राज्यपाल बदलणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यात पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (८१) यांना जम्मू-काश्मीरचे राज्यपाल करण्यात येर्इल, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. तेथे २०२० पासून मनोज सिन्हा राज्यपाल आहेत.

भाजप सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी दोन-तीन राज्यपाल बदलण्याची शक्यता आहे. त्यात केरळचे राज्यपाल अरिफ मोहम्मद खान यांचाही समावेश आहे. मोदी आपले पत्ते कधीच उघडे करीत नसल्यामुळे नसते अंदाज व्यक्त करून त्यांचा रोष ओढवून घेण्याचे नेते टाळत आहेत. सूत्रांनी म्हटले आहे की, कॅप्टनच्या नेतृत्वात भाजप पंजाबमध्ये काही लोकसभा जागा निवडून आणू शकेल असा भाजपचा होरा होता, मात्र त्याऐवजी सुनील जाखड यांच्या हाती पंजाबची सूत्रे देण्यात आली आहेत. जाखड हे सुद्धा कॉंग्रेसचेच माजी नेते आहेत. ते माजी लोकसभा अध्यक्ष आणि कट्टर कॉंग्रेस समर्थक बलराम जाखड यांचे पुत्र आहेत. यामुळे आता अरमिंदर सिंग यांना शांत करण्यासाठी जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदाची माळ त्यांच्या गळ्यात घालण्यात येर्इल, असे भाजप सूत्रांचे म्हणणे आहे.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत