राष्ट्रीय

अनिल अंबानींचे घर आणि कार्यालयावर CBIचे छापे

अनिल अंबानी आणि त्यांची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्स यांच्या विरोधात सीबीआयने फसवणुकीचा एक नवीन गुन्हा दाखल केला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : अनिल अंबानी आणि त्यांची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्स यांच्या विरोधात सीबीआयने फसवणुकीचा एक नवीन गुन्हा दाखल केला आहे. तपास यंत्रणेचा आरोप आहे की अनिल अंबानी आणि त्यांच्या कंपनीने २०१३ ते २०१७ या वर्षांदरम्यान बँक ऑफ बडोदासोबत २,२२० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केली आहे.

बँकेची तक्रार मिळाल्यानंतर, सीबीआयने गुरुवारी अनिल अंबानींच्या घरी आणि रिलायन्स कम्युनिकेशनच्या कार्यालयांवरछापे टाकले, जिथून कर्ज व्यवहारांशी संबंधित अनेक महत्त्वाचे दस्तावेज जप्त करण्यात आले. दरम्यान, अनिल अंबानी एका दुसऱ्या प्रकरणात ईडी समोर हजर झाले होते, तपास यंत्रणेने त्यांची सुमारे ९ तास चौकशी केली.

सीबीआयनुसार, बँक ऑफ बडोदाच्या तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Mumbai Ganeshotsav 2026 : गिरगावात १३३ वर्षांची परंपरा; नारळापासून साकारली १० फुटांची मूर्ती, Video

Mumbai : अंधेरीत साकारणार मीनाक्षी मंदिर; क्रांती गणेशोत्सव मंडळाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष

Mumbai : गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज; ३८३ कृत्रिम तलाव; १,१३२ जीवरक्षक तैनात

Mumbai : धोकादायक पुलांवर खबरदारी! गणेशोत्सवात सावधगिरीचे आवाहन; रेल्वे मार्गावरील पुलांचा समावेश

Mumbai : चेंबूरमध्ये चालत्या बेस्ट बसला आग; चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला, ४० प्रवासी बचावले