प्रातिनिधिक छायाचित्र
राष्ट्रीय

CBSE बारावी परीक्षेचा निकाल जाहीर; निकालात ३.१९ टक्के घट, मुलींची बाजी

केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळामार्फत (सीबीएसई) घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. हा निकाल ८५.२० टक्के इतका लागला असून यामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. तर गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकालामध्ये ३.१९ टक्क्यांनी घट झाली आहे.

Swapnil S

मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळामार्फत (सीबीएसई) घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. हा निकाल ८५.२० टक्के इतका लागला असून यामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. तर गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकालामध्ये ३.१९ टक्क्यांनी घट झाली आहे.

सीबीएसई मंडळाची बारावीची परीक्षा १७ फेब्रुवारी ते १० एप्रिल या कालावधीत पार पडली होती. देशभरातील १७ लाख ६८ हजार ९६८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी १५ लाख ०७ हजार १०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण ८५.२० टक्के आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण ८८.८६ टक्के आहे. तर मुलांचे प्रमाण ८२.१३ टक्के आहे. राज्य मंडळाच्या निकालाप्रमाणेच या निकालामध्येही मुलींनीच बाजी मारली आहे.

जगभरातील ७ हजार ५७३ केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाते. निकालानंतर विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका तसेच इतर शैक्षणिक कागदपत्रे 'डिजीलॉकर' मार्फत उपलब्ध करून दिली आहे. बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन करण्यासाठी यंदा सीबीएसई मंडळाने ऑन स्क्रीन मार्किंग प्रणालीचा वापर केला. यामुळे देशातील कोणत्याही भागातून उत्तरपत्रिकेचे मूल्यमापन करणे शक्य झाले. प्रत्येक उत्तराचे मूल्यमापन निर्धारित गुणयोजनेनुसार होत असल्याने विद्यार्थ्यांना न्याय्य निकाल मिळण्यास मदत झाल्याचे मंडळाने म्हंटले आहे.

पुणे विभागाचा निकाल ८७.३२ टक्के पुणे विभागाचा निकाल ८७.३२ टक्के लागला आहे. पुणे विभागातून ४२ हजार २८५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामध्ये २२ हजार ७८५ मुले तर १९ हजार ५०० मुली होत्या. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी ३६ हजार ९३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये मुलांची संख्या १९ हजार ५७७ इतकी असून उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८५.९२ टक्के आहे. तसेच मुलींची संख्या १७ हजार ३४६ इतकी असून त्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण ८८.९५ टक्के आहे.

Maratha Reservation : मनोज जरांगेंची मोठी घोषणा; मोर्चा मुंबईत धडकणार, जाण्याचा मार्गही ठरला

इंटरनेटशिवाय UPI पेमेंट? RBI च्या नव्या सुविधेने काय बदलणार? जाणून घ्या सविस्तर

महाबळेश्वर-पाचगणी परिसरात स्ट्रॉबेरी लागवडीची लगबग सुरू; मजूर टंचाई, वाढती रोजंदारी आणि उत्पादन खर्चामुळे शेतकरी चिंतातूर

SRA कडून ४५० हून अधिक निष्क्रिय विकासकांची हकालपट्टी

Ganeshotsav 2026 : मुंबईकरांना घरबसल्या मिळणार उकडीचे अन् तळलेले मोदक; BMC च्या महिला बचत गटांचा खास उपक्रम