संग्रहित छायाचित्र 
राष्ट्रीय

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात २ टक्के वाढ

केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्क्यांची वाढ करण्यास मंजुरी दिली. या दुरुस्तीमुळे महागाई भत्ता आता ५३ टक्क्यांवरून ५५ टक्के होणार आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्क्यांची वाढ करण्यास मंजुरी दिली. या दुरुस्तीमुळे महागाई भत्ता आता ५३ टक्क्यांवरून ५५ टक्के होणार आहे. ही वाढ सातव्या वेतन आयोगांतर्गत झाली आहे. सरकारने आठवा वेतन आयोगही स्थापन केला आहे. नवीन वेतन आयोगाच्या शिफारशी जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची शक्यता आहे.

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये वर्षातून दोन वेळा वाढ केली जाते. ही वाढ सहामाही तत्त्वावर होते. यापूर्वी जुलै २०२४ मध्ये महागाई भत्ता ५० टक्क्यांवरून ५३ टक्के करण्यात आला होता. यात ३ टक्के वाढ झाली होती. आता नव्या निर्णयानुसार भत्त्यात २ टक्के वाढ करण्यात आली आहे. ही वाढ जानेवारी २०२५ ते जून २०२५ पर्यंतची आहे.

सरकारने मार्च महिन्यात भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली असली तरी केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे भत्तेही थकबाकी म्हणून मिळणार आहेत. जर केंद्रीय कर्मचाऱ्याचे मूळ वेतन १९,००० रुपये असेल तर त्या कर्मचाऱ्याला १०,०७० रुपये महागाई भत्ता मिळत होता. आता २ टक्के वाढीनंतर हा भत्ता १०,४५० रुपये होईल. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात ३८० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

Mumbai : सुरसम्राज्ञी आशा भोसले पंचतत्त्वात विलीन; शिवाजी पार्कमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Mumbai : नॉन-एसी लोकलमध्ये आता ऑटोमॅटिक दरवाजे; कुर्ला कारशेडमध्ये नव्या EMU रेकचे आगमन, पाहा VIDEO

Mumbai : 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली ६० लाखांची फसवणूक; महिलेला मालमत्ता विकायलाही भाग पाडले

Mumbai : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दादरमध्ये ट्रॅफिक निर्बंध; कोणते रस्ते बंद? जाणून घ्या सविस्तर

Thane : कल्याण-मुरबाड मार्गावर भीषण अपघात; इको व्हॅन-सिमेंट मिक्सर धडकेत ११ जणांचा मृत्यू, वाहनाचा चक्काचूर