राष्ट्रीय

केरळमध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळल्याने केंद्र सरकार अलर्ट; राज्यांसाठी खबरदारीच्या सूचना जारी

केरळमध्ये JN.1 व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळून आल्याने कर्नाटक सरकार देखील अलर्ट झाले आहे. या राज्याने वयस्कर नागरिकांना मास्क घालण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.तसेच केरळ-कर्नाटक सीमेवरुन प्रवासावर काही निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे.

Swapnil S

केरळमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झालेला पहिला रुग्ण आढळून आल्याने केंद्र सरकार अलर्ट झाले आहे. केंद्राने या पार्श्वभूमीवर राज्यांसाठी खबरदारीच्या सूचना जारी केल्या आहेत.

केरळमध्ये JN.1 हा कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळून आला आहे. तिरुवनंतपुरममधील एका ७९ वर्षीय महिलेला या विषाणूची लागण झाली आहे. येणारे काही दिवस सण उत्सवाचे आहेत. त्यामुळे विषाणुचा प्रसार वेगाने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी काही खबरदारी घेण्याची गरज आहे, असे केंद्राने दिलेल्या सूचनेत म्हटले आहे.

केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांमध्ये सांगण्यात आले आहे की, जिल्हा पाताळीवर रुग्णांचे सर्व्हेक्षण केले जावे. यातील सर्दीसारखा आजार, श्वास घेण्यास अडचण अशा रुग्णांची ओळख करावी. सर्व जिल्ह्यांमध्ये आवश्यक कीट असल्याची खात्री करण्यात यावी.

कोरोनाचा JN.1 व्हेरियंट हा पिरोलाचा भाऊबंध असल्याचे देखील सांगितले जात आहे. या विषाणूचा पहिला रुग्ण अमेरिकेमध्ये २०२३ च्या सप्टेंबरमध्ये आढळून आला होता. त्यानंतर चीनमध्ये डिसेंबर महिन्यात या विषाणूची लागण झालेले ७ रुग्ण आढळून आले होते.

काळजी करण्याचे कारण नाही, मात्र खबरदारी घेणे आवश्यक

कोरोनाचा JN.1 हा विषाणू तसा सौम्य आहे. यामुळे काळजी करण्याचे कारण नसल्याचे वैज्ञानिकांकडून सांगण्यात आले आहे. या विषाणूची लागण झाल्यास सौम्य ताप, खोकला, श्वास घेण्याचा त्रास, सर्दी अंगदुखी, डोकेदुखी अशा प्रकारची लक्षणे जाणवू शकतात. मात्र, या विषाणूच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने खबरदारी घेणे आवश्यक आहे.

केरळमध्ये JN.1 व्हेरियंटचा पहिला रुग्ण आढळून आल्याने कर्नाटक सरकार देखील अलर्ट झाले आहे. या राज्याने वयस्कर नागरिकांना मास्क घालण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.तसेच केरळ-कर्नाटक सीमेवरुन प्रवासावर काही निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या सूचना जारी झाल्यानंतर राज्य सरकारला आवश्यक त्या उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी