नवी दिल्ली : देशात लठ्ठपणा वाढत असल्याने समोसा-जिलेबीबाबत ‘धोकादायक’ इशारा दिल्याच्या बातम्या मंगळवारी प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र असा कोणताही इशारा दिलेला नाही, असा खुलासा सरकारने केला आहे.
पीआयबी फॅक्ट चेकने हे वृत्त नाकारले. त्यानंतर आरोग्य खात्याने सांगितले की, समोसा, जिलेबीवर कोणतेही ‘धोकादायक’ लेबल लावले जाणार नाही.
आरोग्य खात्याने सांगितले की, ही माहिती अफवेवर आधारित होती. त्यामुळे अफवेवर विश्वास ठेवू नये. समोसा-जिलेबी खायची असल्यास तुमची प्रकृती बघून तुम्ही खाऊ शकता. आरोग्य खात्याने केवळ सल्ला जारी केला आहे. लोकांनी ऑफीस व कामाच्या ठिकाणी आरोग्यदायी खाणे खावे.