राष्ट्रीय

चांद्रयानाचा प्रवास योजनेनुसार

चंद्राभोवती १०० किमीच्या कक्षेत सोडण्याची प्रक्रिया जटिल

नवशक्ती Web Desk

बंगळुरू : चांद्रयान-३चा आतापर्यंतचा प्रवास योजनेनुसार सुरू आहे. मात्र, यापुढे यानाला चंद्राच्या भोवताली १०० किलोमीटर अंतरावरील कक्षेत पाठवण्याची प्रक्रिया जटिल आहे, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सोमवारी दिली.

श्रीहरिकोटा येथील तळावरून १४ जुलै रोजी प्रक्षेपण झाल्यानंतर चांद्रयान-३ ने आतापर्यंतचा प्रवास पूर्वनियोजनाप्रमाणे पार पाडला आहे. यानाला आता चंद्राभोवती कमीत कमी १७० किमी आणि अधिकाधिक ४,३१३ किमी अंतराच्या कक्षेत स्थापित केले आहे. पुढील काही दिवसांत क्रमाक्रमाने यानाला चंद्राच्या अदिकाधिक जवळच्या कक्षेत पाठवले जाईल. यान चंद्रावर उतरवण्यापूर्वी त्याला चंद्रापासून १०० किमी अंतरावरील कक्षेत स्थापित केले जाईल. ही प्रक्रिया जटिल आहे. मात्र, इस्रोने सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून काटेकोर नियोजन केले आहे. यापूर्वीच्या चांद्रमोहिमेदरम्यान झालेल्या चुकांमधून धडा घेतला आहे. आम्ही हा टप्पादेखील यशस्वीपणे पार पाडू, असा विश्वास एस. सोमनाथ यांनी व्यक्त केला. दरम्यान, चांद्रयान-३ने घेतलेली चंद्राच्या पृष्ठभागाची पहिली छायाचित्रे इस्रोने जारी केली आहेत.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक