राष्ट्रीय

Work pressure: चेन्नईत कामाच्या ताणामुळे अभियंत्याची आत्महत्या?

चार्टर्ड अकाउंटंट अ‍ॅना सेबास्टियन पेरायल नावाच्या युवतीचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच चेन्नईतील एका अभियंत्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

Swapnil S

चेन्नई : चार्टर्ड अकाउंटंट अ‍ॅना सेबास्टियन पेरायल नावाच्या युवतीचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच चेन्नईतील एका अभियंत्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. कामाचा दबाव सहन होत नसल्याने या अभियंत्याने स्वत:ला विजेचा शॉक लावून जीवन संपवल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कंपन्यांतील वाढत्या कामाच्या ताणाबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

एका सॉफ्टवेअर कंपनीत अभियंता असलेले कार्तिकेयन हे चेन्नईत पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. गेल्या दोन महिन्यांपासून ते नैराश्याच्या आजारावर उपचार घेत होते. कामाच्या दबावामुळे ते मानसिक तणावात होते, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. आत्महत्येच्या वेळी ते घरी एकटेच होते. त्यांची पत्नी के. जयराणी बाहेर गेली होती आणि आपल्या मुलांना तिने आईकडे सोडले होते. गुरुवारी घरी परत आल्यानंतर घराचा दरवाजा न उघडल्याने तिने दुसरी चावी वापरून घरात प्रवेश केला. तेव्हा त्यांना कार्तिकेयन यांचा मृतदेह आढळला. पोलिसांनी या प्रकरणात अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदवला असून तपास सुरू केला आहे. कामाच्या दबावामुळे आलेल्या नैराश्यामुळे कार्तिकेयनने आत्महत्या केली असल्याचा आरोप नातलगांनी केला आहे. कार्तिकेयन यांनी विजेचा शॉक घेऊन आपले जीवन संपवले.

फडणवीस-शिंदे-ठाकरेंमध्ये रंगली जुगलबंदी; आमच्यासोबत सत्तेत या! मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंना सभागृहातच थेट ऑफर

राज ठाकरे यांचे ‘तळ्यात-मळ्यात’; युतीबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही!

चाचपडते विरोधक, धडपडते सरकार

मारू नये सर्प संताचिया दृष्टी

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी