छत्तीसगडमध्ये भाजपने काँग्रेसला मोठा शह दिल्याचं चित्र दिसत आहे. आज ३ डिसेंबर रोजी छत्तीसगड विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यात ७ आणि १७ नोव्हेंबर असं दोन टप्प्यात ९० विधानसभा क्षेत्रांसाठी मतदान पार पडलं. ३ जानेवारी २०२४ रोजी छत्तीसगडच्या विधानसभेचा कार्यकाळ संपत आहे.
छत्तीसगड राज्या सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला ४६ जागांचा जादुई आकडा गाठायचा असतो. गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या भूपेश बघेल यांच्या नेतृत्वात काँग्रेसचं सरकार स्थानप झालं होतं. या निवडणुकीत मात्र छत्तीसगड काँग्रेसच्या हातातून जाताना दिसत आहे. निवडणुक आयोगाच्या सुरुवातीच्या ट्रेंड नुसार दुपारी एक वाजेपर्यंत हाती आलेल्या आकड्यांनुसार छत्तीसगड विधानसभेच्या निकालात भाजपने जोरदार मुसंडी मारत ५३ जागांवर आगाडीवर होता. तर काँग्रेसची ३४ जागांवर पिछेहाट झाली होती. इतर उमेदवरांनी ३ जागांवर आघाडी घेतली होती.