राष्ट्रीय

नूह येथे ब्रजमंडल शोभायात्रेला बंदी ; मुख्यमंत्री खट्टर यांची माहिती

नवशक्ती Web Desk

चंदीगड : नूह येथे २८ ऑगस्ट रोजी ब्रजमंडल शोभायात्रा काढायला हरियाणा सरकारने परवानगी नाकारली आहे. नूहमध्ये एक महिन्यापूर्वी हिंसक घटना घडली असल्याने सतर्कता बाळगणे गरजेचे बनले आहे.

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर म्हणाले की, नूहमध्ये यात्रा काढण्याचा प्रयत्न करू नये. आपल्या जवळच्या मंदिरात पूजा करावी. कायदा व सुव्यवस्था राखणे ही सरकारची जबाबदारी आहे.

दरम्यान, यात्रा काढण्यापूर्वी एक दिवस आधी नूहमध्ये सरकारने १४४ कलम लागू केले आहे. शाळा, महाविद्यालय व मोबाईल इंटरनेट सेवा २८ ऑगस्टपर्यंत बंद आहे. पोलीस ड्रोनच्या माध्यमाद्वारे टेहळणी करत आहे.

नूहमध्ये ३१ जुलै रोजी अर्धी राहिलेली ब्रजमंडल शोभायात्रा पूर्ण करण्याबाबत विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी सांगितले की, २८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता शोभायात्रेला सुरूवात करू. यात्रेची परवानगी घेण्याचा प्रश्नच नाही. २८ ऑगस्टला श्रावणी सोमवार आहे. त्यामुळे आपल्या देवावर जलाभिषेक करण्याचा भाविकाचा अधिकार आहे. हा देश धर्म मानणारा आहे. या देशात कोणतीही शोभायात्रा काढायला परवानगी घेतली जात नाही. कुंभ मेळा आयोजित करताना परवानगी घेतली जाते का? असा प्रश्न त्यांनी केला.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त