Visuals from Kakwa, Imphal | X | PTI
राष्ट्रीय

Clashes in Manipur: मणिपूरमध्ये चकमक; ४० विद्यार्थी जखमी

मणिपूरचे पोलीस महासंचालक आणि मणिपूर सरकारचे सुरक्षा सल्लागार यांना पदावरून दूर करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आणि महिलांनी राज भवनाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना पांगविण्यासाठी सुरक्षा दलांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या, त्यावेळी झालेल्या चकमकीत ४० हून अधिक विद्यार्थी जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Swapnil S

इम्फाळ : मणिपूरचे पोलीस महासंचालक आणि मणिपूर सरकारचे सुरक्षा सल्लागार यांना पदावरून दूर करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आणि महिलांनी राज भवनाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना पांगविण्यासाठी सुरक्षा दलांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या, त्यावेळी झालेल्या चकमकीत ४० हून अधिक विद्यार्थी जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सोमवारपासून एका बाजारपेठेजवळ तळ ठोकून राहिलेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी राज भवनकडे कूच करण्याचा प्रयत्न केला तेव्हा वाटेतच काँग्रेस भवनजवळ त्यांना सुरक्षा दलांनी अडविले. त्यानंतर उडालेल्या चकमकीच्या वेळी सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. वांशिक संघर्षामुळे धगधगत असलेल्या मणिपूरमध्ये सुरक्षेसाठी केंद्र सरकारने जवळपास दोन हजार कर्मचारी असलेल्या सीआरपीएफच्या दोन बटालियन पाठविण्याचे आदेश दिले आहेत, असे मंगळवारी एका अधिकाऱ्याने सांगितले. बटालियन क्रमांक ५८ तेलंगणामधील वारंगळ येथून तर अन्य ११२ क्रमांकाची बटालियन झारखंडमधील लतेहार येथून मणिपूरला पाठविण्यात येत आहे. पहिल्या बटालियनचे मुख्यालय चुराचंद्रपूर येथील कांगवाई येथे, तर दुसऱ्या बटालियनचे मुख्यालय इम्फाळभोवती असणार आहे.

इम्फाळ पूर्व-पश्चिम संचारबंदी जारी

इम्फाळ पूर्व-पश्चिम जिल्ह्यात मणिपूर सरकारने संचारबंदी जारी केली असून प्रतिबंधात्मक आदेशही जारी केले आहेत.

मणिपूर - इंटरनेट सेवा बंद

मणिपूर सरकारने मंगळवारी नव्याने आदेश जारी करीत केवळ खोऱ्यातील पाच जिल्ह्यांमध्येच इंटरनेट सेवा स्थगित करीत असल्याचे जाहीर केले. विद्यार्थ्यांच्या निदर्शनांची व्याप्ती पाहून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यापूर्वी संपूर्ण राज्यात पाच दिवसांसाठी इंटरनेट सेवा स्थगित करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता.

रॉकेटचे अवशेष सापडले

इम्फाळ : मणिपूरमध्ये ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर आता अत्याधुनिक रॉकेटचे अवशेष सापडल्याचे वृत्त आहे. हल्ल्यांसाठी ड्रोन अथवा रॉकेटचा वापर करण्यात आला नाही, असा दावा आसाम रायफल्सच्या एका माजी उच्चपदस्थ अधिकाऱ्याने केला तो मणिपूर पोलिसांनी फेटाळून लावला. ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचे हल्ले करण्यात आल्याचे पुरावे मिळालेले आहेत. ड्रोन हस्तगत करण्यात आले आहेत त्याचप्रमाणे अत्याधुनिक रॉकेटचे अवशेषही मिळाले आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी