राष्ट्रीय

भर सभागृहात नितीश कुमार म्हणाले, दारू पिऊन मृत्युमुखी झालेल्यांच्या कुटुंबियांना...

प्रतिनिधी

बिहारच्या सारण येथे बनावट दारूमुळे ५३ जणांचा मृत्यू झाला. तर, त्यानंतर सिवानमध्येही बनावट दारूमुळे ५ जणांच्या मृत्यूची बातमी आली. मात्र, यानंतर बिहार विधानसभेत या विषयावरून मोठा गदारोळ झाला. यानंतर सभागृहात मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दारू पिऊन मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना कोणतीही भरपाई दिली जाणार नाही, अशी मोठी घोषणा केली. ते पुढे म्हणाले की, "आम्ही नेहमीच सांगत आलो आहोत की, दारू पिऊ नका. मृत्यू होईल, असे आवाहन वारंवार करत आहोत. मद्यप्राशनाच्या बाजूने बोलणारे तुमचे काही भले करु शकत नाहीत,"

बिहारमध्ये गेल्या काही महिन्यात बनावट दारूमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हा मुद्दा विधानसभेमध्ये चांगलाच गाजला. मुख्यमंत्री नितीश कुमार या मुद्द्यावर आक्रमक होत, "जे बनावट दारू पितात, ते मरणारच," असं विधान केले. यावरून त्यांच्यावर विरोधकांनी चांगलीच टीका केली. मात्र, तरीही ते आपल्या भूमिकेवर ठाम होते. 'ही माझी वैयक्तिक इच्छा नसून राज्यातील महिलांच्या आक्रोशाला प्रतिसाद आहे.' असे त्यांनी पुढे म्हंटले. यानंतर संसदेत हा मुद्दा उपस्थित करणाऱ्या भाजप नेत्यावर नाराजी व्यक्त केली. मात्र, भाजपसह विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घातला आणि त्यांनी सभात्याग केला. मात्र, नितीश कुमार यांच्या निर्णयामुळे देशभर चर्चा झाली.

... तर तुम्हाला नक्कीच सुवर्णपदक मिळेल; फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ पोस्ट करत रोहित पवारांचा टोला

अमित शहांच्या भाषणाचा एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल, FIR दाखल

विनातिकिट प्रवास हा गुन्हाच- हायकोर्ट; उच्चपदस्थ अधिकाऱ्याला तूर्तास दिलासा

माढ्यात फडणवीसांनीही टाकला डाव; अभिजित पाटील, धवलसिंह भाजपच्या गळाला?

दक्षिण भारतात पाण्याची भीषण टंचाई, केवळ १७ टक्के जलसाठा; महाराष्ट्र, गुजरातमध्येही परिस्थिती भीषण