राष्ट्रीय

कोइंबतूर एअरपोर्टजवळील धक्कादायक घटना; कॉलेजच्या विद्यार्थिनीचे अपहरण करून तिघांनी केला गँगरेप; प्रियकरालाही केली मारहाण

एका खासगी कॉलेजमधील प्रथम वर्षाची पदव्युत्तर विद्यार्थिनी (वय-२०) तिच्या प्रियकरासह रविवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास कारमध्ये बोलत होती. त्यावेळी...

Krantee V. Kale

तामिळनाडूमधील कोइंबतूर येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. २० वर्षांच्या तरुणीवर रविवारी (२ नोव्हेंबर २०२५) रात्री उशीरा कोइंबतूर आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील निर्जन ठिकाणी तिघांनी सामूहिक बलात्कार केला. घटनेनंतर तिन्ही आरोपी फरार झाले असून पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी विशेष पथकांची स्थापना केली आहे. या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एका खासगी कॉलेजमधील प्रथम वर्षाची पदव्युत्तर विद्यार्थिनी तिच्या प्रियकरासह रविवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास कारमध्ये बोलत होती. एअरपोर्टजवळ, वृंदावन नगर-एसआयएचएस कॉलनी रोडलगत त्यांची कार उभी होती. त्याचवेळी दुचाकीवर आलेल्या तीन जणांच्या टोळक्याने त्यांना बघितले. त्यांनी कारची काच फोडली, दरवाजा उघडला आणि तिच्या प्रियकरावर हल्ला करून तिला बळजबरी निर्जन ठिकाणी घेऊन गेले आणि अत्याचार केला. पीडित तरूणी मूळ मदुराईची रहिवासी असून कोइंबतूर येथे शिक्षणासाठी आल्याचे समजते.

प्रियकराने पोलिसांना केला फोन

थोड्यावेळाने शुद्धीवर आलेल्या तिच्या जखमी प्रियकराने पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहिम राबवली असता सकाळी सुमारे ४ वाजता विमानतळापासून एका किलोमीटर अंतरावर असलेल्या खासगी कॉलेजच्या मागील निर्जन भागात पोलिसांना ती मुलगी सापडली. तिला तत्काळ सीत्रा परिसरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर, सोमवारी सकाळी फॉरेन्सिकचे पथक पुरावे गोळा करण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले.

आरोपींनी आधी दुचाकी चोरली

“त्या तिघांनी कोविलपालयम परिसरातून एक दुचाकी चोरली आणि विमानतळ मार्गावरून जात असताना त्यांनी कारमध्ये असलेल्या या दोघांना पाहिले. आरोपींना पकडण्यासाठी सात विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे.” असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, जखमी तरुणाला कोइंबतूर मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

अशाप्रकारच्या घटनांमध्ये वाढ - AIDWA

या घटनेमुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली असून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप होत आहे. तर, ऑल इंडिया डेमोक्रॅटिक वुमेन्स असोसिएशन (AIDWA) ने देखील ही घटना धक्कादायक असल्याचे म्हटले असून कोइंबतूर शहर पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी केली आहे. शहर पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात, कोइंबतूरमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

Mumbai : एचपीव्ही लसीकरणामुळे गर्भाशय कर्करोगावर नियंत्रण; केईएम रुग्णालयात २८२ लाभार्थ्यांना एचपीव्हीची मात्रा

NEET UG 2026 Re-Exam : फ्लश टँकमध्ये मोबाईल लपवून परीक्षेत कॉपीचा प्रयत्न; १८ वर्षीय विद्यार्थ्याला अटक

NEET Paper Leak : लातूरच्या 'क्लास बाजारा'ला फटका; सोशल मीडियातील अफवा पडल्या भारी

Mumbai Rain : मेघगर्जनेसह पावसाचे जोरदार पुनरागमन! वांद्रे-वरळीसह अनेक भागांत मुसळधार सरी, ऑरेंज अलर्ट जारी

Mumbai BEST Strike : अखेर तोडगा निघाला! राज्य सरकारसोबतच्या चर्चेनंतर बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; बससेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत