ANI
राष्ट्रीय

LPG Price Rise: व्यावसायिक सिलिंडर ३९ रुपयांनी महाग

व्यावसायिक सिलिंडरच्या दरात रविवारपासून ३९ रुपयांची वाढ झाली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : व्यावसायिक सिलिंडरच्या दरात रविवारपासून ३९ रुपयांची वाढ झाली आहे. १९ किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर आता मुंबईत १,६४४ रुपयांना मिळेल, तो आधी १६०५ रुपये इतका होता. असे असले तरी १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. मुंबईत घरगुती गॅस सिलिंडर ८०२.५० रुपयांना मिळत आहेत. दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरची किंमत १,६९१ रुपये झाली आहे. चेन्नईमध्ये हाच सिलिंडर १,८५५ रुपयांना मिळत आहे. त्याचबरोबर रविवारपासून दूरसंचार नियमनात बदल करण्यात आले असून त्यामुळे फेक कॉल्स आणि मेसेजचे प्रमाण थांबवता येतील.

Maratha Reservation : मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी अखेर आझाद मैदानात; बेमुदत आंदोलनावर ठाम, पावसातही आंदोलकांचा उत्साह कायम

लातूर-नांदेडमध्ये मुसळधार पावसाचा कहर; बचावासाठी लष्कराची मदत, जनजीवन विस्कळीत

...तर मुख्यमंत्र्यांच्या कारकीर्दीला धोका! मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा इशारा

दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप; २९,९६५ गणेशमूर्तीच विसर्जन

...तर भारताचा 'टॅरिफ' कमी करू! व्हाइट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांचे वक्तव्य