PM
राष्ट्रीय

राम मंदिर निमंत्रणावरून केरळ काँग्रेसमध्ये गोंधळ

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभा खासदार के. मुरलीधरन यांनी सांगितले की, केरळ काँग्रेसने राष्ट्रीय नेतृत्वाला समारंभात सहभागी न होण्याचे आवाहन केले

Swapnil S

थ्रिसुर : अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या राम मंदिराच्या स्थापना समारंभात आपले नेते सहभागी होतील की नाही, ते केरळ काँग्रेसने स्पष्ट करावे, असे केरळ भाजपने काँग्रेसला विनंतीपर सांगितले आहे. त्यांच्या सहभागाबद्दल अंतिम निर्णय जाहीर न केल्याबद्दल केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी टीका केली आहे.

अयोध्या राम मंदिर अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रीय नेतृत्वाला आमंत्रण देण्याबाबत घेतलेल्या राजकीय भूमिकेबद्दल काँग्रेसच्या केरळ राज्य विभागाच्या प्रमुख नेत्यांनी भिन्न मते प्रसारित केल्यानंतर राज्य भाजप प्रमुखांनी ही टीका केली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभा खासदार के. मुरलीधरन यांनी सांगितले की, केरळ काँग्रेसने राष्ट्रीय नेतृत्वाला समारंभात सहभागी न होण्याचे आवाहन केले आहे, तर केपीसीसी प्रमुख के. सुधाकरन म्हणाले की, राज्य युनिटने या प्रकरणावर आपली भूमिका राष्ट्रीय नेतृत्वाला सांगितल्याबद्दल त्यांना माहिती नाही. केरळमधील प्रमुख मुस्लीम सुन्नी धर्मगुरू समस्थ यांनी राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्याबाबत पक्ष अनिर्णित असल्याची टीका केल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी ही विधाने केली.

या सर्व पार्श्वभूमीवर केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी विचारणा केली आहे की, या मुद्द्यावर मार्क्‍सवादी पक्ष, डाव्या आघाडीचे भागीदार, समाजाचे नेते इत्यादींनी दिलेल्या धमक्यांकडे काँग्रेस झुकणार आहे का? एवढ्या प्रश्नाचे उत्तर द्यावे. राज्यातील जनतेला स्पष्ट उत्तर देण्याचे आवाहन याद्वारे त्यांनी काँग्रेसला केले आहे.

आदित्यनाथ यांचा अयोध्या दौरा रद्द

अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंदिर नगरी भेटीपूर्वी अयोध्येतील तयारीचा आढावा घेण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गुरुवारी अयोध्या दौरा खराब हवामानामुळे रद्द करण्यात आला, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. पंतप्रधान ३० डिसेंबरला अयोध्येत येत आहेत. आदित्यनाथ यांचा दौरा शुक्रवारी होता. त्यानुसार ते प्रथम हनुमानगढ़ी मंदिराला भेट देणार होते आणि नंतर रामलल्लाच्या दर्शनासाठी जाणार होते आणि राम मंदिराच्या सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी करणार होते.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश