राष्ट्रीय

"काँग्रेसची संघटना कमकुवत..." काँग्रेसच्या या नेत्याने दिला घरचा आहेर

सध्या राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस पक्षाची स्थिती कमकुवत असून काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने याबाबत कानउघडणी केली आहे

नवशक्ती Web Desk

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. "काँग्रेसची संघटना ही कमकुवत झाली असून मतदानाच्या दिवशीही पक्षाचे निवडणूक व्यवस्थापन कमकुवत असते" अशी कानउघडणी त्यांनी केली. मध्य प्रदेशमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी काँग्रेस पक्ष हा संघटित नसल्याचे मान्य करायला हरकत नाही, असेदेखील सांगितले.

कोबीग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणाले की, "मतदानादिवशी निवडणूक व्यवस्थापनात फार मोठी कमतरता भासते. जी तयारी करायला हवी, ती तयारी करण्यात येत नाही. लोकांना काँग्रेसला मतदान करायचे आहे. पण, आमची संघटना कमकुवत असल्याने ते करू शकत नाहीत." अशी नाराजी त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच ते पुढे म्हणाले की, " काँग्रेस पक्षाचा जिथे पराभव झाला आहे, त्याठिकाणी भेटी देऊन अहवाल तयार केला जाणार आहे. त्यानंतर तो अहवाल माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याकडे सोपण्यात येणार आहे. यावरून आता निवडणुकीसाठी नवीन पद्धतीने रणनीती आखण्यात येणार आहे." असे त्यांनी सांगितले.

ओबीसी आरक्षणाला धक्का नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; नोंदी असलेल्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार

‘देवाभाऊ’ कॅम्पेनवरून जोरदार वादंग; जाहिरात देणारा भाजपच्या मित्रपक्षाचा मंत्री - रोहित पवार

मुंबईला मिळणार वातानुकूलित वंदे मेट्रो; २ हजार ८५६ डब्यांच्या खरेदीची निविदा जाहीर

निवडणूक आयोग भाजपचे कार्यालय बनले का? मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

अस्तित्व वाचवण्यासाठी ओमी कलानींची धडपड; अखेर युतीसाठी शिंदे गटाचा दरवाजा ठोठावला