राष्ट्रीय

काँग्रेस, इंडिया आघाडी मणिपूरचा प्रश्न संसदेत पूर्ण ताकदीनिशी मांडणार; राहुल गांधी यांनी केले स्पष्ट

Swapnil S

नवी दिल्ली : काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी संसदेत मणिपूरचा प्रश्न पूर्ण ताकदीनिशी मांडेल, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी येथे मणिपूरच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: मणिपूरला भेट द्यावी, तेथील जनतेच्या समस्या ऐकून घ्याव्यात आणि शांततेचे आवाहन करावे, या मागणीचाही राहुल गांधी यांनी पुनरुच्चार केला.

राहुल गांधी सोमवारी मणिपूरच्या दौऱ्यावर गेले होते, तेथे त्यांनी जनतेशी संवाद साधला. त्याची छायाचित्रे 'एक्स'वर पोस्ट केल्यानंतर ते बोलत होते. मणिपूरमध्ये हिंसाचाराचा उद्रेक झाल्यापासून आपण तेथे तीनदा भेट दिली. परंतु, दुर्दैवाने तेथील स्थितीत सुधारणा झालेली नाही. अद्यापही राज्य दोन भागांमध्ये विभागलेले आहे. घरे जळत आहेत, निष्पाप लोकांचे जीवन धोक्यात आले आहे आणि हजारो जणांना जबरदस्तीने मदत छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे, असेही गांधी यांनी म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी मणिपूरचा दौरा करावयास हवा, तेथील जनतेच्या समस्या ऐकून घ्यावयास हव्यात आणि शांततेचे आवाहन करावयास हवे, असे विरोधी पक्षनेते म्हणाले. मणिपूरमधील संघर्षावर तोडगा काढण्यासाठी सरकारवर दबाव टाकावा म्हणून काँग्रेस आणि इंडिया आघाडी संसदेत मणिपूरचा प्रश्न पूर्ण ताकदीनिशी मांडेल, असेही गांधी म्हणाले.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त