राष्ट्रीय

पंतप्रधान मणिपूर पेटवू इच्छितात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आरोप

भारतात काय होत आहे, हे पंतप्रधानांना समजत नाही

नवशक्ती Web Desk

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये जे घडत आहे, ते लष्कर दोन दिवसांत रोखू शकते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मणिपूरला पेटवू इच्छितात, वाचवू इच्छित नाहीत, असा घणाघाती आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला.

संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर दुपारी ३ वाजता राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, मणिपूर जळत असताना पंतप्रधान हसत हसत बोलत होते, हे त्यांना शोभत नाही. भारतात कुठेही हिंसाचार होत असल्यास त्यांनी हसत हसत बोलू नये. मी १९ वर्षे राजकारणात आहे. मी प्रत्येक राज्यात गेलो आहे. पूर, त्सुनामी, हिंसाचार होतो, तेथे आम्ही जातो. १९ वर्षांच्या अनुभवावरून मी सांगतो की, मणिपूरमध्ये मी जे पाहिले, ते कुठेही पाहिले नाही. आम्ही जेव्हा मणिपूरच्या मैतेईच्या परिसरात गेलो, तेव्हा आम्हाला सांगितले की, तुमच्या सुरक्षेत कुकी असल्यास आम्ही गोळी मारू. कुकी परिसरात गेलो तेव्हा सांगितले की, मैतेई सुरक्षेत असल्यास आम्ही गोळ्या मारू. मणिपूर दोन भागात विभाजित झाला आहे. भारतात काय होत आहे, हे पंतप्रधानांना समजत नाही. ते मणिपूरला जाऊ शकत नाहीत तर किमान त्याबाबत बोलावे तरी. मणिपूरमध्ये जे घडत आहे, ते लष्कर दोन दिवसांत रोखू शकते. पंतप्रधान मणिपूरला पेटवू इच्छितात, त्यांना ते वाचवण्याची इच्छा नाही, असे गांधी म्हणाले.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश