काँग्रेस नेते जयराम रमेश एएनआय
राष्ट्रीय

‘सीडीएस’नी सिंगापूरला खुलासा का केला? काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा सवाल

भारताचे ‘सीडीएस’ जनरल अनिल चौहान यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या संघर्षात पाकने भारताची विमाने पाडल्याप्रकरणी खुलासा सिंगापूरला का केला? असा सवाल काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : भारताचे ‘सीडीएस’ जनरल अनिल चौहान यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या संघर्षात पाकने भारताची विमाने पाडल्याप्रकरणी खुलासा सिंगापूरला का केला? असा सवाल काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे.

‘सीडीएस’ चौहान यांनी सिंगापूरला विमान पाडली गेल्याचा खुलासा केल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. रमेश म्हणाले की, लष्करी व परदेशी धोरणाबाबत सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलावणे गरजेचे आहे. ‘सीडीएस’ जनरल अनिल चौहान यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत महत्त्वाची माहिती सिंगापूरला असताना का दिली? तसेच पंतप्रधान व संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत पहिल्यांदा ही माहिती देणे गरजेचे होते, असे रमेश म्हणाले.

कारगिल युद्धानंतर भारताच्या संरक्षण तयारीबाबत विशेष पुनर्आढावा समिती तीन दिवसांत स्थापन केली गेली होती. आताही अशाच प्रकारची समिती स्थापन केली पाहिजे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे वडील त्या समितीचे अध्यक्ष होते. हा अहवाल संसदेत मांडून त्यावर व्यापक चर्चा झाली होती.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video