राष्ट्रीय

क्रेडिट सुसे आर्थिक संकटात? जगभरात मंदीचे तीव्र संकेत

वृत्तसंस्था

लेहमन ब्रदर्स ही जगविख्यात बँक २००८ मध्ये बुडाली. त्यानंतर जगात तीव्र मंदीची लाट आली होती. आताही स्वित्झर्लंडमधील क्रेडिट सुसे ही जगातील मोठी बँक आर्थिक संकटात सापडल्याचे संकेत मिळत आहेत. ही बँक बुडित निघाल्यास जग मोठ्या मंदीच्या खाईत सापडू शकते, असा इशारा तज्ज्ञ देत आहेत.

जग सध्या महागाईचा सामना करत आहेत. आता आर्थिक संकटाचे लक्षण दिसू लागले आहेत. स्वित्झर्लंडची जागतिक इन्व्हेस्टमेंट बँक आणि जगातील मोठी वित्त संस्था ‘क्रेडिट सुसे’च्या शेअरमध्ये घसरण झाली आहे. यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये मोठी भीती पसरली आहे. वाढत्या महागाईमुळे कंपनी आर्थिक संकटातून जात आहे. वर्षभरापूर्वी बँकेचे भागभांडवल २२.३ अब्ज डॉलर्स होते. आता ते १०.४ अब्ज डॉलर्सपर्यंत घसरले आहे. वर्षभरात कंपनीच्या समभागांमध्ये मोठी घसरण झाली आहे. दरम्यान, कंपनीचे सीईओ उलरिच कॉर्नर यांनी गुंतवणूकदारांकडून काही दिवसांचा वेळ मागितला आहे.

बँकेचा क्रेडिट डिफॉल्ट स्वॅप वाढला

बँकेच्या क्रेडिट डिफॉल्ट स्वॅप वाढला आहे. तो १५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. यातून कंपनी दिवाळखोरीत निघण्याची शक्यता किती आहे हे दिसून येते. सध्या कंपनी भांडवल उभे करण्याचे प्रयत्न करत आहे. त्यासाठी आपली काही मालमत्ता ती विकू शकते.

दरम्यान, बँकेने याबाबत कोणतीही माहिती स्पष्ट रुपाने सांगितले नाही. २७ ऑक्टोबर रोजी आपल्या रणनीतीबाबत ते जाहीर करतील, असे सांगितले जाते.

क्रेडिट सुसेबरोबर डॉएच्च बँकेबाबतही नकारात्मक बातम्या येत आहेत. या बँकांचा जगात मोठा व्यवसाय आहे.या कंपन्या अडचणीत सापडल्या जग हे मोठ्या आर्थिक मंदीत सापडेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल