...तर कंपन्यांना नफ्याचा फटका; युद्धाच्या परिणामाची क्रिसिलला भीती 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

Iran US Tensions : ...तर कंपन्यांना नफ्याचा फटका; युद्धाच्या परिणामाची क्रिसिलला भीती

अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम टिकून राहिल्यास आणि ऊर्जेचा पुरवठा सुरळीत राहिल्यास पश्चिम आशियातील अलीकडील संघर्षाचा भारतीय कंपन्यांच्या नफ्यावर होणारा परिणाम सुरुवातीला व्यक्त केलेल्या भीतीपेक्षा निम्म्याने कमी होण्याची शक्यता आहे असे क्रिसिल रेटिंग्जने म्हटले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम टिकून राहिल्यास आणि ऊर्जेचा पुरवठा सुरळीत राहिल्यास पश्चिम आशियातील अलीकडील संघर्षाचा भारतीय कंपन्यांच्या नफ्यावर होणारा परिणाम सुरुवातीला व्यक्त केलेल्या भीतीपेक्षा निम्म्याने कमी होण्याची शक्यता आहे असे क्रिसिल रेटिंग्जने म्हटले आहे.

पतमानांकन संस्थेने म्हटले आहे की होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या जहाज वाहतुकीतील व्यत्ययासह दीर्घकाळ चालणाऱ्या संघर्षाच्या परिस्थितीत दोनशे बेसिस पॉइंट्सच्या फटक्याच्या त्यांच्या आधीच्या अंदाजाच्या तुलनेत दोन हजार सत्तावीस या आर्थिक वर्षात भारतीय कंपन्यांच्या नफ्याच्या मार्जिनमध्ये शंभर बेसिस पॉइंट्सची घट होण्याची आता त्यांची अपेक्षा आहे.

अमेरिका - इराण यांच्यातील कमकुवत सामंजस्य करारानुसार होर्मुझची सामुद्रधुनी उघडल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या मोठ्या घसरणीनंतर हा सुधारित अंदाज वर्तवण्यात आला आहे. क्रिसिलने इशारा दिला आहे की, भूराजकीय धोके वाढलेले आहेत. गॅस पुरवठा सुरळीत होण्यासाठी वेळ लागू शकतो.

  • क्रिसिलच्या मूल्यांकनामध्ये ३४ क्षेत्रांचा समावेश आहे. त्यांचा कॉर्पोरेट कर्जामध्ये ६५ टक्के वाटा आहे.

  • या आर्थिक वर्षात ब्रेंट कच्च्या तेलाची ८० ते ८५ डॉलर प्रति बॅरल राहील आणि गॅस पुरवठ्यातील व्यत्यय चार महिने टिकून राहील, असे गृहीत धरले आहे.

  • २२ क्षेत्रांच्या तुलनेत १० क्षेत्रांच्या नफ्यात लक्षणीय घट होण्याची अपेक्षा आहे.

RRB Recruitment 2026 : रेल्वेत ३,९९३ पदांसाठी मेगाभरती; अर्ज प्रक्रिया सुरू, पात्रता काय? जाणून घ्या

शाहरुख, अजय देवगणसह टायगर श्रॉफला FDA चा दणका; 'विमल इलायची' जाहिरातीप्रकरणी नोटीस

LPG eKYC Last Date : अजून ई-केवायसी केली नाही? आजच करा, नाहीतर सिलिंडर मिळण्यात येणार अडचण

Nalasopara : वाढदिवसाच्या केकमध्ये मृत पाल? चिमुकल्यांसह ११ जण रुग्णालयात, परिसरात खळबळ

एसी लोकल दुरुस्ती केंद्रासाठी ३७१ कोटींचा निधी; वाणगाव येथे देखभाल केंद्राची उभारणी